सोमवार, 4 अक्तूबर 2010

मी गजला का लिहितो----.माझी नवी गजल..

असह्य जगणे सुसह्य करण्या लिहितो गझला /
मीठीत तुझिया विरघळण्याला लिहितो गझला /


छक्के पंजे बावरलेले ,गोंधळ्लेही/
जिंकून घेण्या डाव रडीचा लिहितो गझला /


स्नेहसरोवर दाटून आला नयनी तुझिया /
बिंदू होऊन त्यात मिसळण्या लिहितो गझला /


फार पाहिली वाट तुझी मी त्या दिवशीला/
त्या घाटाची वाट शोधण्या लिहितो गझला /


पाठमोरी तू किती देखणी वळली होतीस/
गज-याचा त्या गंध ऊजळण्या लिहितो गझला /


वीणा घेऊन रियाझ करण्या बसलेले ते/
मोहक रुपडे आळवण्याला लिहितो गझला /


कृतार्थ होईल असे वाटले जगणे माझे/
तुझाच राणी ठाव शोधण्या लिहितो गझला /


One of my friends, Shrikant Susar, keeps on asking me the same question of my motive of writing Gazaals.
This gazal is the poetic rejoinder to this question....which i have written in late night i.e.2.30 am.
The last couplet i.e.Makhta.is the concluding remark of my intention of my journey to Gazal.

2 टिप्‍पणियां:

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...