गुरुवार, 17 मई 2012

मातृदिनानिमीत्त वैभव जोशींची गझल.


आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई
तुझ्याविना पण जगावयाचा स्वभाव नाही आई/

दारावर पाटीच्या जागी “आई”लिहिले आहे
याहून कुठले साजेसे नावगाव नाही आई/

काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते
माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई/

तुला पाहूनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली
बाकी ह्या अंगणी फ़ुलांचा आभाव नाही आई/

छप्पर होते तुझे तोवरी वादळ तुडवीत होतो
आता साध्या फ़ुंकरीपुढे निभाव नाही आई/

एक तुझे ते असणे होते एक तुझे ते नसणे
या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई/

काफ़ीया किती सिध्दहस्तपणे वापरता येतो ते वैभव जोशी या गझलेत दाखवतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेत १३ तारखेच्या कवीसंमेलनात सादर झालेली ही गझल.

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली,सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली,या झोपडीत माझ्या //

महाली मऊ बिछाने,कंदील शामदाने,
आम्हा जमीन माने ,या झोपडीत माझ्या //

भूमीवरी पडावे ,ता-यांकडे पहावे,
प्रभूनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या //

स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे,
माझा हुकूम गाजे,या झोपडीत माझ्या //

महालापुढे शिपायी, शस्त्र सुसज्ज राही,
दरकार तीही नाही,या झोपडीत माझ्या //

जाता तया महाला,“मत जाव” शब्द आला,
भिती न यावयाला,या झोपडीत माझ्या//

महालात चोर गेले,चोरून द्रव्य नेले,
ऐसे कधी न झाले,या झोपडीत माझ्या //

पहारे आणि तिजो-या, त्यातून होती चो-या,
दारांस नाही दो-या,या झोपडीत माझ्या //

महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही,
झोपेत रात्र जाई,या झोपडीत माझ्या //

येता तरी सुखे या,जाता तरी सुखे जा,
कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या//

चित्त्तात अन्य रामा, ह्रदयी उदंड प्रेमा,
येती कधी न कामा,या झोपडीत माझ्या //

पाहून सौख्य माझे,देवेंद्र तो ही लाजे,
शांती सदा विराजे,या झोपडीत माझ्या //

वाडे महाल राने,केले अनंत ज्याने,
तो राहतो सुखाने,या झोपडीत माझ्या //

तुकड्या मती स्फ़ुरावी, पायी तुझ्या रमावी,
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या //


                                                   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


A renown social reformer and the author of famous ''Gram-Geeta" Tukdoji Maharaj has written this delicate peace of poetry. The beauty of poem lies in the choice of words and in the sustained comparison between the luxuries of sophisticated life and the rustic life of poor folks.My brother Vishnu used to hum this poem when i was just a child. 
भूमीवरी पडावे ,ता-यांकडे पहावे,
प्रभूनाम नित्य गावे, These colloquial phrases are so effective and reminiscent of my childhood when we used to sleep on terrace and see the galaxy of glimmering stars. The childhood memories run riot in my mind when i read this poem  in 'Lokrajya Magazine', which has been given by Shripad Joshi.

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...