सोमवार, 22 मार्च 2010

महाश्वेता

चिन्तन करुनी मन्थन झाले कसे व्हायचे /
या प्रश्नाला उत्तर नव्हते कसे व्हायचे//
चैत्रपहाटी मोहरुन गेल्या वनराई /
त्यांनाही झोडपले वारे कसे व्हायचे//
आरोप कधी मी विश्वासचा तुजवर केला /
विश्वासाच्या निश्वसाचे कसे व्हायचे//
सोडून आलो बहरून आल्या मधुकुंजाला/
झोडपले त्यांनाही वारे मग कसे व्हायचे//
तुझ्या स्मृतीची झालर झाल्या माझ्या गझला /
पैठणीच पण तुझी फ़ाटकी कसे व्हायचे//
त्या मधाळ अन गोड्गुलाबी ओठावरचे /
लेणे चोरुन घेतना मग कसे व्हायचे//
नकोस तू इतक्यात फ़ुलारुन येवू राणी/
प्रतिक्षेतल्या त्या ऒळींचे कसे व्हायचे//
जुनीच ती उशीरा यॆण्य़ाची रीत सोड गडे राणी/
दिवाण्य़ानॆ प्रतीक्षेत दम तोड्ल्यावर कसे व्हायचे//
सज्ज करुनि घेउन आलो गुढी उभाराया /
पूजेस नटूनी तू नसताना कसे व्हायचे/
--------------------- प्रशान्त पुरुषोत्तमराव धर्माधिकारी.

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...