बुधवार, 5 मार्च 2014

सलणा-या अनेक वेल्हाळ वेळा खुणावत असतात माणसाला ।

पण का कुणास ठाऊक ती दुखरी आर्त वेदना ग्रेसांच्या ओल्या वेळूच्या

 बासरीतूनच मुखरीत होते ।

नाजुक संवेदनांना अलगदपणे शब्दाँच्या चिमटीत घेणे हेच तर कवितेचं

 खरं सौंदर्यस्थळ असतं । 

एखाद्या कलेवरात प्राण फुंकल्यावर चैतन्याचा निर्झर जसा ओसंडून 

वाहतो तसा कविताकामिनीचा विलास मनात रेँगाळत राहतो ।

गालिब , कबीर , कालिदास . रिल्के , जिब्रान , भास व तुकारामादि 

अवलियांनी हाच तर धागा पकडला . 

कवी अलेक्झांडर पोप ज्याला 

'What often was thought but never so well expressed' 

म्हणतो.

कवी आपल्या अनवानीपनाचं श्रेय असं कुणालाही वाटत फिरत नाही तर

 ती दुखरी वेदना खोलवर रुजवत असतो ।

"रिस रहा है खून दिलसे लब मगर हसते रहे ।

कर गया बरबाद मुझको ये हुनर कहना उसे।"


मेहंदी हसनची ही गझल अजूनही याच संवेदनेला फुँकर घालतेय । 


मेंदूत हिंडणा-या या फुलपाखराला चिमटीत पकडावं म्हणतोय .

पण कसं?

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...