शुक्रवार, 12 अगस्त 2022

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भाषिणीम् सुखदां वरदां मातरम्॥ १॥ कोटि कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले, अबला केन मा एत बले। बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम्॥ २॥ तुमि विद्या, तुमि धर्म तुमि हृदि, तुमि मर्म त्वम् हि प्राणा: शरीरे बाहुते तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति, तोमारई प्रतिमा गडी मन्दिरे-मन्दिरे॥ ३॥ त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम् नमामि कमलाम् अमलां अतुलाम् सुजलां सुफलाम् मातरम्॥४॥ वन्दे मातरम् श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम् धरणीं भरणीं मातरम्॥ ५॥ संपूर्ण वंदे मातरम शब्दश: अर्थःः- हे _*माते(मातृभूमे) तुला मी वंदन करतो. [जिच्या सर्व नद्या पाण्याने ओसंडून वहात आहेत अशा]!जलसंपदेने भरपूर,जिच्यामधे भरपूर धनधान्य पिकते,जिचा आसमंत मलय पर्वतावरून येणार्या थंड वार्यामुळे शीतल झालेला आहे,(सुपीक अशा) कृष्णवर्णी मातीने नटलेल्या माझ्या माते तुला मी वंदन करतो!।।१।। चंद्रकिरणांच्या धवल चांदण्याच्या योगे जिथल्या रात्री पुलकित/पावन झालेल्या आहेत;पूर्ण उमललेल्या फुलांमुळे जिथल्या झाडांच्या फांद्या सुशोभित झालेल्या आहेत,जिच्या चेहर्यावर म॓द स्मित आहे,जी निरतिशय गोड बोलते,जी सर्वांना सुखच देते,सर्वाना (आनंदाचे)वरदान देते अशा माझ्या मातृभूमे,तुला मी वंदन करतो,।।२।। जिच्या कोटी कोटी (पुत्रांच्या )कण्ठांंमधे (झर्यांच्या पाण्याप्रमाणे) "कल (तळपत्या)संगिनी आहेत, अशा माझ्या मातृभूमे तुला अबला कोणी कसे काय म्हणू शकेल??हे असीम शक्तिधारिणे,(आपल्या पुत्रांचे)रक्षण करणार्या,शत्रुसैन्याचा पूर्ण निःपात करणार्या मातृभूमे,मी तुला वंदन करतो।।३।। हे माते,तूच माझी विद्या आहेस,तूच माझा धर्म आहेस! ●माझ्या हृदयातही तूच विराजमान आहेस आणि माझ्या जीवनाचे इप्सित म्हणजेच मर्म ते ही तूच आहेस.माझ्या शरीरातील प्राण तूच आहेस,माझ्या बाहूंमधील शक्ती तूच आहेस,आणि माझ्या हृदयातील भक्तीही तूच आहेस!संपूर्ण देशातील मंदिरांमधून तुझीच मूर्ती विराजमान झालेली आहे.माते मी तुला वंदन करतो!।।४।। हे माते,आपल्या दाही भुजा मध्ये वेगवेगळी शस्त्रास्त्रं धारण करणारी तू, कमलपुष्पा मध्ये विहार करणारी देवी लक्ष्मी आहेस!तूच माझी विद्या दात्री वाणी आहेस!मी तुला नमस्कार करतो! देवी लक्ष्मी, तू अतिनिर्मला आहेस,अतुलनीय आहेस!जलसंपन्न आहेस,फळा फुलांनी भरलेली आहेस! मी तुला नमस्कार करतो.ll५।। माते रंगाने तू श्यामल आहेस आणि अंतःकरणाने मात्र अत्यंत सरळ आहेस!तू सदैव हसतमुख आहेस आणि वेगवेगळ्या आभूषणांनी सुशोभित आहेस!तू आमचे भरण पोषण करणारी,आम्हाला धारण करणारी आमची माता आहेस!मी तुला वंदन करतो! ।।भारत मातेचा विजय* असो।।_

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...