रविवार, 2 जनवरी 2011

मानस माझे

मानस माझे दाटून तेंव्हा आले होते /

अंत:करणी ओथंबून दव आले होते//

जिला ठेविले जपून सुगंधी अत्तरदाणीत/
कसे हे तीक्ष्ण फ़ुलांनी केले होते//

 चुका नेहमी होती, जाती ठेवून जखमा /
जखमांनाही आता कसे कळवळले होते//


मी केलेला गुन्हाच नव्हता रडण्यापडण्याजोगा/
गोंधळ करूनी तूच तयाला मोठे केले होते//

फ़ार वाटले होते तिजला फ़ुटेल पाझर आता/
उत्तर नकी होता माझे गणितंच चुकले होते//

समोरच्याने जरीही आता समज दाविली थोडी/
हातामधूनी निसटंत जगणे कधीच गेले होते//

सगळे साले स्वार्थासाठी लचके तोडून गेले /
स्वच्छ भावनांशी जणु त्यांनी सुतक पाळले होते//

हा एकाकी होऊन गेला प्रशांतेने सागर ./
तरंग उठला एक तरीही गलबलल्यागत होते//

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

संपूर्ण वंदे मातरम चा अर्थ Meaning of Sampurn Vande Mataram

वन्दे मातरम् सुजलां सुफलाम् मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्। शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम् फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम् सुहासिनीं सुमधुर भ...