सोमवार, 31 अगस्त 2020

रामायणाची आरती:आरती रामायण ग्रंथा जानकी जीवन रघुनाथा!

रामायणाची आरती



आरती रामायण ग्रंथा जानकी जीवन रघुनाथा !ध्रु!

आरंभी बालकाण्ड रचना| वाल्मिकी कथीली असे सूचना| कोटी शतग्रंथ विवेक भरणा| वर्णिता शक्ती नसे कवना|
 कथेची पुढे कैसी प्रौढी | 
कथेची पुढे कैसी प्रौढी|
राक्षस जलन | दशरथ लग्न| राम अवतरण| वाशिष्ठा शरण राम रीघता| पावला पूर्ण ज्ञानसरिता||१||



पर्णीली सिता चिदशक्ती| पुढे योजिली राज युक्ती| 
विकल्पे  करू कैकयी माता|बुद्धी भ्रव शली  दशरथा| 
पितृ आज्ञेने रघुनाथा |
पितृ आज्ञेने रघुनाथा| 
निघे कानना |दुष्ट मर्दना| सुखी सज्जना |करोनी निष्कंटकपंथा |पंचवटी वस्तीकरी स्वस्था||२||


मर्दीली   स्वरूप शूर्पणखा | विटंबोनी पाठविली लंका|
मारुनी  खर दुषण आणिका|वधूनी विजयी रामसखा| 
देखता भगिनी रूपाला| 
देखता भगिनी रूपाला| 
शत्रूचा उदयी| दचकला  हृदयी|  रावणी विट मानुनी चित्ता| 
म्हणे जानकी आणीन मी आता||3|| 

कपट मृग मातुल मायावी| निघे घेऊन मयजावई |
राम मग मृग वधावया जाई| रावणाने सीतानेली लवलाही|
पळे घेऊनी तस्कर जैसा |
पळे घेवोनी तस्कर जैसा|
मानी मनीहर्ष |करूपाहे स्पर्श|चापभय हर्ष| 
निराशा मानोनीया चित्ता|अशोकवणी ठेवी  जनकदुहिता||4||


राम विद्वांस गुफापाहि|वनामध्ये सिता सिता बाहे| 
शिळा दृम उद्धरित जाई|शक्र सूत  वधीला लवलाही|
मित्र सुत मित्र जोडीयेला|
 मित्र सुत मित्र जोडीयेला|
सीतेची शुद्धी करूनी महा बुद्धी|राक्षसा वधी| साह्यकरुनी सैन्य सरिता|वदे रामाशी शुभ वार्ता ||5||

तयारी करी राम राणा |सुग्रीवे सिद्ध करुनी सेना|
ऐकता उठला वीरभर्णा|वधावया रावण कुंभकर्ण|
दशयोजने वानर सेना |
दशयोजने |वानर सेना|
करती भुभू: कार| समुद्रापार|जावया शिळा सेतू करिता|पावले राम सुवेळा आता||6||

अंगदे  केली शिष्टाई|न मानीच रावण तीळराई|
देखता राम चमु पाही|घातला घाला ते समयी|
रावनेसिद्ध करूनी सेना |
रावनेसिद्ध करूनी सेना|
आला रणरंगी|वीरश्री अंगी|तरुवर भंगी|शेवटी रावण देह हंता|
राम सर्वांची करी तृप्ता ||7||

मुक्त सूरवर करून सिता|भेटला राम भरतभक्ता|
सुखावे गुरु विप्र सरिता|पावला राजासन सत्ता|
आनंदे कौशल्यामाता|
आनंदेकौशल्यामाता|
सप्त कांडाचा|हाच मतितार्थ|लीला रघुनाथ|
वाटला आनंद बहुचित्ता|प्रभू मल्लेश्वर गुण गाता||8||

शनिवार, 8 अगस्त 2020

Ashvin Sanghi: Do you really want to preserve secularism in India? Then preserve the Hindu ethos first

 A #longread penned by me yesterday:


August 5, 2020 marked the bhoomi pujan of the Ram temple in Ayodhya. I have noticed that many have been genuinely anguished by this event. Some have been bemoaning it as the death of secularism in India.


I consider myself to be secular, so why do I do not see it that way?


What does the term ‘secular’ mean?


Strictly speaking, secularism means separation in entirety of church and state.


In a secular nation, the government must stay away from anything religious. But isn’t it odd that the word ‘secular’ was not part of the preamble to the Indian constitution when it was originally adopted?


Why was such an important word left out? As I see it, the omission was deliberate. What is even more surprising is that the two people who guided the drafting of the preamble of the Constitution were BR Ambedkar and Jawaharlal Nehru, whose secular credentials were unimpeachable.


To be secular in the truest sense of the word, the Indian state would have to stay out of the religious ambit completely. And this was almost impossible.


How could Indian courts recognise Sharia-based Muslim Personal Law while claiming to be secular? How could Central and State governments take over the management of Hindu temples if they were secular? How could a secular government provide financial assistance to educational institutions run by religious organisations? How could a secular government codify and modify Hindu personal law? How would the government extend the existing caste-based reservations to minority religions if it were secular?


These and many more such actions would clearly fall outside the remit of a secular nation. The writers of the preamble realised that it was better not to use the term rather than to use it dishonestly.


But then, just before midnight of 25 June 1975, the Emergency arrived. Over the next two years, the prime minister could rule by decree and most of Indira Gandhi’s political opponents were thrown in prison.


It was during this time that a series of constitutional amendments were passed. Many of these were extremely controversial not only because they were passed as ordinances but also because of the sweeping powers that they vested in the prime minister. Nestled among other sweeping changes was the insertion of the word ‘secular’—and also ‘socialist’—into the preamble of the Constitution.


Did the insertion of ‘secular’ imply that India had not been secular before 1976? Had the omission of the word turned India into a Hindu Rashtra?


Not at all.


By leaving the word out of the preamble, the fathers of the Constitution were making it incumbent on Hindus to remember their commitment to the Upanishadic ideal of ‘Vasudhaiva Kutumbakam’. That the world is one family. The framers of the Constitution were subtly saying that the Indian ethos was essentially Hindu in character but that ethos implied an ingrained respect for and tolerance of all faiths.


So, secularism in the Indian context would not mean the state remaining away from religion. Instead it would mean maintaining equidistance from all religions. Unfortunately, that equidistance never happened. Over the years, the test of secularism came to be whether India’s minorities perceived an action as secular or not.


For example, the government gave itself very little day-to-day control over the Central Waqf Council or over Christian institutions but soon exercised incredible control over Hindu temples.


Nehru decided to pass the four Hindu Code Bills while abandoning the objective of a Uniform Civil Code.


Even in politics, seeking Muslim votes by appealing to the Imam of Jama Masjid was considered smart but appealing to Hindu seers was communal.


Speaking up for minority rights was noble but speaking up for Kashmir’s abandoned Pandits was not.


This was no longer secularism; it was selectivity. This particular selectivity eventually came to be called pseudo-secularism by India’s saffron organisations and soon became the rallying cry of the majority.


What did several decades of this selectivity achieve? Frankly, all that it did was to create a majoritarian backlash. The Hindus, including myself, felt that there was a permanent burden on us to continuously ‘prove’ our secular credentials; to constantly apologise for actions that could be perceived as non-secular in this country.


Have you heard of the term ‘collective memory’?


Collective memory refers to the shared pool of memories and information of a social group. That pool of memories is significantly associated with the group’s identity.


For example, today’s generation of Jews may not have lived through the Holocaust but they carry collective memories of it. They even carry memories of their exile from Jerusalem and their captivity in Babylon although this event took place 2600 years ago. The same collective memory applies to Hindus too. Many Hindus share the collective victimhood of years of Muslim and Christian assaults on Hindu civilisation.


And those assaults were many. Take the example of the Somnath temple.


The temple was first destroyed in 725 CE by the Arab governor of Sindh, Al-Junayd. After it was rebuilt, it was destroyed during the invasions of Mahmud of Ghazni in 1025. It was rebuilt but destroyed yet again by Allauddin Khilji in 1299. The temple was once again restored only to be destroyed by the Muslim governor of Gujarat, Zafar Khan, in 1395. In 1451, it was desecrated by Mahmud Begada, the Sultan of Gujarat.


The final blow came from Aurangzeb who pulled it down in 1665.


None of today’s Hindus were present when any of those acts happened but we all carry collective memories of that victimhood.


Take another example. One of the most sacred Hindu temples is the Kashi Vishwanath in Varanasi.


The original temple was destroyed by the commanders of Mohammad Ghori in 1194. After being rebuilt, it was again wrecked during the reign of Sikander Lodhi in the fifteenth century. The final blow was delivered by Aurangzeb who razed the temple and built the Gyanvapi mosque in its place.


Similarly, Aurangzeb also destroyed the ancient Keshavnath temple in Mathura and built the Shahi Idgah mosque on its plinth.


Three of the holiest sites of Hindus—Ayodhya, Kashi and Mathura—were all destroyed and rebuilt as mosques.


You don’t even need to go to Somnath, Ayodhya, Kashi or Mathura to see the wanton trail of destruction. If you are in Delhi, simply visit the Quwwat-ul-Islam mosque next to the Qutb Minar. Outside the mosque is a plaque that proudly announces that the mosque was built using parts recovered from the demolition of 27 Hindu and Jain temples.


The collective Hindu memories of victimhood are not only related to the destruction of temples but also to other actions. According to American historian Will Durant, “the Islamic conquest of India was probably the bloodiest story in history.” Ferishta, the Persian historian of the sixteenth century, talks of instances when the Bahmani sultans set targets of one lakh infidel heads to roll.


Death was often preferable to slavery, particularly sex slavery. Ahmad Shah Abdali’s army captured Maratha women for the Afghan harems. Often, when non-Muslim women were captured and impregnated, they were left with no alternative but to convert to Islam.


When Muslim armies surrounded Rajput forts, Hindu women within would commit jauhar—throwing themselves into open pyres—to save themselves while their husbands were slain on the battlefield.


If it wasn’t destruction, death or defilement, then it was duties—more specifically jizya, a tax payable by dhimmis or non-muslims.


Alauddin Khilji decreed that those who did not pay could be legally enslaved and sold in cities where there was demand for slave labour. Firoz Shah Tughlaq ordered that Hindus who converted to Islam would be exempted but those who chose to stay Hindu would pay a higher rate of jizya.


Jizya was abolished by Akbar but reintroduced by Aurangzeb and charged at twice the zakat paid by Muslims. More than tax, jizya was institutionalised humiliation and punishment for a dhimmi’s non-belief.


And all of this cruelty was perpetrated on a population that prided itself on providing sanctuary to others.


Zoroastrian refugees fleeing Muslim persecution in Iran were provided a home in Gujarat by a Hindu king, Jadi Rana.


St. Thomas' Christians were provided a home in Kerala.


The first Jewish refugees settled over two millennia ago on the Malabar Coast and a second wave arrived pursuant to their expulsion from Iberia in 1492.


When Buddhist monks were being butchered by the People’s Liberation Army of China, India welcomed the Dalai Lama along with thousands of Buddhists. The country accepted millions of refugees from Bangladesh during the 1971 genocide. The Baghdadi Jews and the Bene Israel from Pakistan were sheltered in India.


That spirit of refuge is intrinsic to India’s Dharmic values. But for how long should India’s Hindus have to remind the world of that?


Some see Hindu revivalism through the lens of Narendra Modi and the BJP but that would be an error. One must go back to the fundamental clash between Abrahamic and Dharmic thought.


Dharmic thought is essentially plural. It embraces multiple truths. Some 33 million deities can be part of the same family. Jesus Christ can be incorporated on the façade of a Hindu temple and the Buddha can be absorbed as an avatar of Vishnu.


You can be aastik or naastik; Shaivite or Vaishnavite; vegetarian or carnivore; fire-worshipper, idol-worshipper or nature-worshipper. You may worship Shiva, Shakti or a combination of both. You may see the path to enlightenment as yantra, tantra or mantra or none of the above. You may hold that the Shiv Linga is a stone and I may hold that a stone is a Shiv Linga, and both of us are welcome.


We can have 300 versions of a single epic called the Ramayana but your version does not negate mine. All religions are seen as different paths to the divine.


Unfortunately, Abrahamic ideology attempts to impose a singular truth on a plural world. There is only one true God who will punish you if you are evil. But if you obey his word and follow his orders scrupulously you may save yourself from the hellfires of damnation. When one couples that absolutism with expansionist and proselytising tendencies, one has all the ingredients for conflict.


Judaism was rarely ever expansionist but both Christianity and Islam were. And both these Abrahamic ideologies wreaked havoc on the world and on themselves, be it through the Arab conquests, the Christian crusades, the Catholic Inquisitions, the Protestant-Catholic conflicts or the Shia-Sunni conflicts.


In India, the effects were profound. Whether it was Ghazni, Aibak, Khilji, Timur, Lodhi, Aurangzeb or Tipu, their direct attacks on Hindus and Hinduism were simply too vicious to fade from collective memory.


And why only Islam? Was Christianity benevolent towards Hindus? The Portuguese exported the Inquisition to Goa in the sixteenth century. Openly practicing Hinduism attracted the death penalty. Thousands were tried by the tribunals of the inquisition. Several were even burned at the stake.


Some historians consider the Goa Inquisition to have been one of the most merciless and cruel ever. It was a machinery of torture and death. Under a 1559 order, Hindu children could be seized and converted to Christianity even if one of the parents died.


Parental property automatically got seized when a Hindu child was taken. Hindu temples were demolished in Portuguese Goa and the community was prohibited from repairing them or building new ones. Any man, woman or child living in Goa could be arrested and tortured for simply whispering a prayer or keeping a small idol at home. Many languished in special inquisitional prisons, some for several years at a time.


I started out by saying that I am secular. But I could have avoided that by simply saying that I am a liberal even though the word has become politically charged.


The word ‘liberal’ is derived from the Latin word ‘liberalis’, a word that means ‘free’. I am firmly committed to individual rights, democracy, free markets, freedom of speech, freedom of religion, gender equality, LGBTQ rights, racial equality and indeed secularism itself. If you are liberal, you are by definition, secular too. But I am also a Hindu and I am proud of it. And I refuse to apologise for that.


Hinduism is among the few pre-Bronze Age cultures to have survived to this day. Do you see Zoroastrianism thriving in Iran? What happened to the Mithraic cults of Rome? What happened to Ra, Osiris and Horus of the Egyptians? What happened to Zeus, Apollo and Athena of the Greeks? What happened to the tribal belief systems and languages of the aboriginal peoples of Australia?


Most pagan belief systems and cultures could not withstand the onslaught of Abrahamic thought, but Hinduism survived against all odds. And that’s why I am proud of it and wish to preserve that legacy.


I firmly believe that we cannot hold the present-day Muslims or Christians responsible for acts of the past that they had nothing to do with. In fact many of today’s Muslims and Christians are the descendants of the very people who were persecuted generations ago and converted at the point of a sword. How foolish would it be to bear a grudge against them in the present?


Peace and harmony across communities is to be considered the greatest blessing from the divine. Truth and reconciliation is absolutely necessary. But truth must come before reconciliation. Truth begins with acknowledging the past. Unfortunately, we never allowed that to happen in India.


See the spate of statues being torn down around the world. These are reactions to one-sided historical narratives. History can be quite easily manipulated by any group to either erase their past sins or glorify their deeds. In India, we whitewashed our history in our effort to maintain the peace. When we do not heal wounds, they fester. Hindu revivalism is a festering wound. And it is much more a symptom of fear than aggression. We need to cauterise that festering wound quickly.


What causes that fear? I have already dealt with some of it. To start with, there are the collective memories of shared victimhood that I spoke of; then there is the sense of injustice caused by flawed secularism; there is also the historical evidence that pagan cultures could not survive Abrahamic onslaught.


But there is also the concern that population growth and proselytising could eventually alter the demographics of the only surviving Hindu civilisations of the world. Also Hindus get worried when they witness the rise of Wahhabi tendencies coupled with the inability of ordinary Muslims to question their faith because they are told that it is the absolute word of God.


When a Hindu looks at South Asia’s demographics, what does he observe? When Pakistan was created in 1947, Hindus were 15 percent of the population but were only 1.6 percent by 1998. In the Bangladesh of 1931, Hindus were 29.4 percent of the population but are less than 9.5 percent today. Contrast that with the Muslim population of India that was 9.9 percent in 1951 and grew to 14.2 percent by 2011. So when those on the left of the ideological spectrum question Indian inclusiveness it rankles the average Hindu.


Hindu fears are also a response to Wahhabi tendencies that have gripped many parts of the world.


In 2013, a Pew Research project was carried out through 38,000 face-to-face interviews of Muslims in 80-plus languages in 39 Muslim-majority countries. It presented some startling revelations.


Around 79 percent of Muslims in countries such as Afghanistan, Egypt and Jordan believed that Muslims who abandoned the faith should be executed.


A startling 39 percent of Muslims across all countries surveyed believed that honour killings could be justified in instances where women had had premarital or extramarital sex.


Almost 42 percent of French Muslims, 35 percent of British Muslims and 26 percent of American Muslims believed that suicide bombings against non-Muslims could be justified.


Scariest of all, 53 percent of those surveyed believed that Sharia, or Islamic law, should be the law in their countries. Can you imagine the fear that such findings trigger in a Hindu who is already carrying historical baggage?


There were 1.8 billion Muslims in the world as of 2015, which was approximately 24 percent of the global population. Although Islam is the second-largest religion after Christianity, by 2060 its numbers will have grown by 70 percent. By that time, Christianity will have grown by 34 percent and Hinduism by around 27 percent. And like the Jews, Hindus have never been very good at proselytising. Why isn’t it a natural reaction for Hindus to worry that they may eventually be overrun?


I am not at all proud of the fact that the Babri Masjid was torn down by a Hindu mob in 1992. But I am proud that 1.3 billion Indians were willing to put their faith in the judiciary to arrive at the Ayodhya verdict. It should never be forgotten that this temple is being built pursuant to a court order and not at the whims of a totalitarian state. And if you believe that the verdict is tainted then you would also have to question thousands of other judgments that went in a direction that fit your sensibilities. You cannot be selective.


Does the Queen of England, being the head of the Church of England, interfere with the secularism of the UK? Does the American President, holding the National Prayer Breakfast each year, interfere with secular principles? Those who believe that India’s secularism is challenged by a Ram temple in Ayodhya should realise that India is secular primarily because of its Hindu ethos.


In most Muslim-majority countries, Islamisation eventually creeps in. Just look at the 49 Muslim-majority countries around the world and you will realise that the only way to preserve secularism is by preserving Hindu syncretism.


We are proud of the Ganga-Jamuna tehzeeb of India. For every Bhimsen Joshi there is a Zakir Hussain; for every Vikram Sarabhai there is an Abdul Kalam; for every Rabindranath Tagore there is a Salman Rushdie. But ask yourself: why did this Ganga-Jamuna syncretism not take root in Pakistan? The answer is the underlying Hindu spirit that simply cannot be ignored.


In recent times, the Australian government has apologised to the aboriginal people for their crimes against them. The South African government has apologised for apartheid. The Japanese have apologised for their war crimes in Asia. The Germans have apologised to the Jews for the holocaust. Even Boris Yeltsin apologised for the Bolshevik Revolution. But from whom should Hindus seek an apology? From the Arabs who gave us Muhammad bin Qasim? From the Afghans who gave us Mahmud Ghazni? From the Turks who gave us Qutb al-Din Aibak? From the Turko-Mongols who gave us Aurangzeb? From the Portuguese who gave us Aleixo Diaz Falcao? Or from the English who gave us Reginald Dyer?


Hindus do not expect an apology from anyone. But my generation is equally unwilling to apologise for being Hindu. We are also tired of being the ones who have to regularly prove how secular we are. This agni-pariksha must stop.


Do you really want to preserve secularism in India? Then preserve the Hindu ethos first.


https://swarajyamag.com/ideas/want-to-preserve-secularism-in-india-well-preserve-the-hindu-ethos-first


रविवार, 26 जुलाई 2020

ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ प्रमोद लाळे यांचे निधन

ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ प्रमोद लाळे यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली व एक मोठा विद्वान काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव झाली.  त्यांच्याकडे पुण्यात असताना बरेचदा जाण्याचा योग आला . त्यांचं आयुष्य अध्ययन अध्यापन व संशोधनात गेलं. ते उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे संस्कृत विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.

डॉ लाळे यांनी उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे 1979 साली 'मल्लिनाथाची साहित्यसंपदा' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.  त्यातील शोधनिबंधाचे ग्रंथ रूपात 'मष्टिनाथ-मनीषा' या शीर्षकार्थाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. २२ विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. हा शोध-निबंधांचा संग्रह  डॉ. प्र. ग. लाळे यांनी ग्रंथ स्वरुपात ‘मल्लिनाथ-मनीषा’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यातील ९ निबंध संस्कृत भाषेत असून इतर तेलुगू आणि इंग्रजी भाषेत आहेत . मल्लिनाथ हा टीकाकार म्हणून इतका प्रसिद्ध होता की ‘मल्लिनाथी’ हा शब्द टीका याअर्थी मराठीत रूढ झाला आहे.

डॉ लाळे यांनी 'मल्लिनाथ' या प्रख्यात टीकाकारावर जो मोनोग्राफ साहित्य अकादमी साठी लिहिला त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचं अजून एक गाजलेले पुस्तक म्हणजे Curses and boons in the Vālmīki Rāmāyaṇa. वाल्मिकी रामायणातील शाप व वरदानांवर हे पुस्तक प्रकाश टाकते.

त्यांच्या निधनाने  त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या काही आठवणी जाग्या झाल्या.  2012 साली भारती विद्यापीठात मी तेव्हा रिसर्च फेलो म्हणून काम करत असे. डॉ विवेकानंद रणखांबे Vivekanand Rankhambe व  डॉ राजाराम झिरंगे Rajaram Zirange यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प सुरू होता. अनेक नव्या गोष्टी शिकत होतो.  यावेळी रामायण महाभारताचा भारतीय इंग्रजी साहित्यावरील प्रभाव या विषयावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ लाळे यांना व्याख्यानासाठी बोलावले होते.  डॉ शिरीष चिंधडे देखील व्यासपीठावर खालील फोटोत त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. माझ्या फेसबुक प्रोफाईलवर 2012 सालचे काही फोटों परत एकदा पोस्ट करत आहे. पंडित वसंतराव गाडगीळ देखील उपस्थित होते.




त्यांच्या कर्तृत्वाला कोटी कोटी वंदन.

गुरुवार, 23 जुलाई 2020

लोकमान्य टिळक लेख संग्रह संपादन: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी



पुस्तकाचे नाव : लोकमान्य टिळक लेख संग्रह
 संपादन: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
 प्रकाशक: साहित्य अकादमी
पृष्ठसंख्या 470

आज 23 एप्रिल, लोकमान्य टिळकांची जयंती.
त्यानिमित्ताने आज प्रस्तुत पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचे असून लोकमान्य टिळकांनी केसरी या दैनिकात लिहिलेल्या लेखनाचा एक सुंदर ठेवा आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखे आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या व्यासंगी विद्वानाने केसरी वृत्तपत्रातील लोकमान्यांची लेखन कला एकत्र संपादित करून आपणासारख्या वाचकांना मोठा नजराणा दिला आहे. तर्कतीर्थ प्रस्तावनेत असं लिहितात की , "टिळकांचे चरित्र म्हणजे विशाल द्रष्टेपणा व अदम्य कर्तेपणा यांचा भव्य संगम होय. टिळक चरित्र म्हणजे 1885 ते 1920 पर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा गाभा होय .ते एक प्रत्यक्षात घडलेले महाकाव्य आहे. हे महाकाव्य साहित्य रुपात प्रकट करणारा प्रतिभासंपन्न चरित्रकार मात्र अजून झाला नाही. परंपरागत अध्यात्मिक भारतीय संस्कृतीच्या कुशीत जन्मलेला व आधुनिक संस्कृतीच्या सिंहीनीच्या स्तनाचे सकस दूध प्राशन केलेला हा "बाळ"आहे. या दुधाची त्यांनी आपल्या लेखनात अनेकदा विशेष प्रशंसा केली आहे. पहिल्या विद्यार्थी दशेतील विचारांच्या उष:काळात त्यांना भारतीय भावी स्वराज्याचे दिव्य स्वप्न दिसले. ते स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत पाहण्याचा जो ध्यास लागला या ध्यासाने सर्व टिळक जीवन अखेरपर्यंत भरले गेले. लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भारतव्यापी अधिष्ठान निर्माण करणारे अग्रणी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कर्तृत्वाला सफल करणाऱ्या लोकशाही शक्तींना गांधींच्या पूर्वी जागृत करणारा दिव्य दिनमणी म्हणजे लोकमान्य टिळक होय .विद्यार्थी दशा संपल्यापासून अखेरपर्यंत सतत 45 वर्षे एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व प्रकारे वैचारिक व सांसारिक मोह टाळून सतत संग्रामस्थ राहणे हाच टिळकांच्या द्रष्टेपणाचा अस्सल निकष आहे.

प्रस्तुत पुस्तकात लोकमान्य टिळकांनी केसरी मध्ये लिहिलेल्या लेखांचे सात वेगवेगळ्या विभागांमध्ये वर्गीकरण केले असून त्यांना अनुक्रमे खालील प्रमाणे नावे दिली आहेत
खंड 1-आधी सामाजिक की राजकीय
खंड 2-स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क
 खंड 3 -काँग्रेस अर्थात राष्ट्रीय सभा
खंड 4-हिंदू मुसलमान संबंध
 खंड 5-परतंत्र भारताच्या आर्थिक समस्या
खंड 6 शैक्षणिक प्रश्न व राष्ट्रीय शिक्षण
खंड 7 संकीर्ण (छत्रपती शिवाजी उत्सव ,गणेशोत्सव व राष्ट्रीय उत्सवाची आवश्यकता ,धर्म व तत्त्वज्ञान आणि प्रसिद्ध व्यक्ती व्यक्ती )

अशी शीर्षके दिली आहेत

 विशेष म्हणजे  या पुस्तकाच्या सातव्या खंडात स्वामी विवेकानंदांवर एक अप्रतिम लेख आहे स्वामी विवेकानंद समाधिस्त झाल्यावर केसरीमध्ये टिळकांनी हा लेख लिहिला तसेच ऋग्वेदाचे भाषांतर करणारा व जेष्ठ प्राच्यविद्या विद्वान प्रोफेसर मॅक्समुल्लर यांच्या मृत्यू नंतर टिळकांनी केसरी मध्ये लेख लिहिला आहे या दोन्ही लेखांचा अभिवाचन करून मी युट्यूब वर व्हिडिओ टाकला आहे तो जिज्ञासूंनी आवर्जून ऐकावा.

विवेकानंदांवरील लेखाची लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/wi4bKWx8czg

मॅक्समुल्लर यांच्यावरील लेखाची लिंक खालील प्रमाणे

https://youtu.be/3hafGzC6pCo

लोकमान्य टिळकांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर केसरी वृत्तपत्रात लिहिलेला अग्रलेख

आज लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस या निमित्ताने

1902 साली स्वामी विवेकानंदांच्या महानिर्वाणानंतर लोकमान्य टिळकांनी "केसरी"त लेख लिहिला. प्रस्तुत लेखात स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा साक्षेपी आढावा लो टिळकांनी घेतला आहे. या लेखाचे अभिवाचन मी या व्हिडिओ मध्ये केले आहे. लो टिळकांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी हा अभिनव प्रयोग. 

आवर्जून ऐका व अभिप्राय कळवा

चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका


संकल्पना व अभिवाचन
डॉ प्रशांत धर्माधिकारी
साहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय

शुक्रवार, 10 जुलाई 2020

मुस्लिम मनाचा शोध :-शेषराव मोरे


मुस्लिम मनाचा शोध
शेषराव मोरे

 थोडसं पुस्तकाविषयी

मुस्लिम मन मुख्यतः इस्लाम मधून घडलेले आहे. मुस्लिम मनाचा शोध म्हणजे पर्यायाने इस्लामचा अभ्यास होय. इस्लामचा अभ्यास म्हणजे मूलतः हा तीन गोष्टींचा अभ्यास . मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र , कुराण व हदीस. या तिन्ही गोष्टी परस्पर आधारित आहेत.  पैगंबर चरित्राचा अभ्यासाशिवाय कुराणातील आदेशांचा संदर्भ लागत नाही. हदीसचा अभ्यास केल्याशिवाय कुराणातील वचनांचा अर्थ कळत नाही. या तीन गोष्टी परस्परात एवढ्या गुंफलेल्या आहेत की त्या अविभक्त व एकजीव झालेल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित व सर्वांगीण अभ्यास केला तरच इस्लामचे सम्यक आकलन होऊ शकते .असा अभ्यास करून बिगर मुस्लिम भारतीय लेखकाने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ अभ्यासपूर्ण नसून तो वस्तुनिष्ठ पद्धतीने तटस्थ वृत्तीने व निष्पक्षपणे लिहिलेला आहे. हिंदू धर्माची प्रशस्ती इस्लाम वर टीका करण्यासाठी नसतानाही तो हिंदू वाद्यांना भावलेला आहे. इस्लामचा गौरव करण्यासाठी नसतानाही तो मुस्लीम पंडितांनी गौरवलेला आहे. समाजवाद्यांनाही तो अभिनंदनीय वाटलेला आहे. वस्तुतः या सर्वांना पसंत पडेल असा इस्लामवर ग्रंथ लिहिणे हेच एक आश्चर्य होते. म्हणूनच या ग्रंथाची अगोदर खाजगी स्वरूपाची अभिप्राय आवृत्ती काढलेली होती. हे आश्चर्याचा वास्तव बनून या ग्रंथाच्या रुपाने समोर आले आहे. 

भारतासारख्या बहुधर्मीय देशात सामंजस्य व राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांसाठी परस्परांचे मन वरचे घडवणारे धर्म समजून घेऊन या मूल्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मर्यादित आपापले धर्म कसे पाहता येतील यांचा विचार केला पाहिजे . हा ग्रंथ म्हणजे या दृष्टीने केलेला एक प्रयत्न आहे.
 
संदर्भ : मलपृष्ठ: मुस्लिम मनाचा शोध 
प्रकाशक:  संगत प्रकाशन, नांदेड

प्रत्येक मराठी भाषकाने आवर्जून वाचावा असा ग्रंथराज आहे।

बुधवार, 1 जुलाई 2020

कृष्णदयार्णव हरीवरदा- प्रथम अध्याय -शुक परीक्षित संवाद Krishna Dayarnav's Harivarada commentary Chapter: 1

कृष्णदयार्णव हरीवरदा- प्रथम अध्याय -शुक परीक्षित संवाद Krishna Dayarnav's Harivarada commentary Ch: 1
युट्युब लिंक खालीलप्रमाणे
कृष्णदयार्णव नावाचे अत्यंत महत्त्वाचे संत कवी महाराष्ट्रात सतराव्या शतकात होऊन गेले.  त्यांनी श्रीमद्भागवताच्या दशम स्कंदावर 42 हजार ओव्यांची "हरी वरदा" नामक दीर्घ टीका लिहिली आहे . दुर्दैवाने ती  म्हणावे तितकी प्रसिद्ध नाही.आपण  संत एकनाथांनी लिहिलेली एकादश स्कंदा वरील टीका, जिला वारकरी संप्रदायात एकनाथी भागवत म्हणतात, त्याचे वाचन नेहमी करतो.  प्रस्तुत व्हिडिओमध्ये
कृष्णदयार्णवांच्या हरीवरदा टीकेतील पहिल्या अध्यायातील निवडक भाग वाचून निरुपण केले आहे .
यामध्ये प्रामुख्याने भागवतातील मुळ कथा आहे.
परीक्षित राजा शिकारकरण्यासाठी वनात जातो. मृगया करून थकून शमीक ऋषींच्या आश्रमात जातो. ते ध्यानातमग्नअसतात.  त्यांनी अतिथी सत्कार केला नाही या रागाने मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये घालून परीक्षित निघून जातो.  आपल्या वडिलांचा झालेला अपमान जेंव्हा शमीक ऋषींचा मुलगा शृंगी पाहतो तेव्हा तो परीक्षितिला शाप देतो की सातव्या दिवशी तक्षक नावाचा नाग परीक्षीतील येऊन दंश करेल.  हा शाप आपल्या मुलांनी दिल्याचं कळल्यावर शमीक ऋषीना खूप वाईट वाटतं. ते परीक्षित राजाला सांगतात की आज पासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू येणार आहे. याप्रसंगी परिस्थितीला वैराग्य प्राप्त होते व आपला ज्येष्ठ पुत्र जनमेजय याला राज्यकारभार सोपवून परीक्षीतही प्रायोपवेशन करण्यासाठी गंगा नदीच्या पावन तीरावर येतो .तेथे  शुकाचार्यांचे आगमन होतं . त्यांच्या मुखातून श्रीमद्‍भागवताचे रसपान करुन परीक्षित राजा मुक्त होतो .असा मूळ कथा भाग आहे .या कथेचे सुंदर चिंतन कृष्णदयार्णव यांनी आपल्या ओवी छंदा मध्ये कसे केले आहे हे मुळातून वाचण्यासारखे आहे. हा  प्रसंग या व्हिडिओमध्ये मी निरूपण केली आहे
मागील भागात कृष्णदयार्णव हे कधी कोण होते व त्यांच्या चरित्राचा स्वतंत्र व्हिडिओ या चैनल वर अपलोड केला आहे तो जिज्ञासूंनी आवर्जून ऐकावा
लिंक खालीलप्रमाणे
"हरिवरदा"कार  कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra
चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका

संकल्पना व निरूपण  डॉ. प्रशांत पुरूषोत्तम धर्माधिकारी

"हरिवरदा"कार कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra



"हरिवरदा"कार  कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra

श्रीमद्भागवतच्या दशम  स्कंधावर 42 हजार ओव्यांची टीका लिहिणारे महाराष्ट्रातील थोडेसे दुर्लक्षित असलेले संत कवी कृष्णदयार्णव यांचे स्थान मराठी साहित्यात मानाचे आहे . संत एकनाथांचा अनुग्रह स्वप्नामध्ये झाल्यावर त्यांनी भागवताच्या दशम स्कंधावर सुंदर मराठीत टीका लिहिली. ही टीका त्यांनी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या परिसरात बसून लिहिली असे म्हटले जाते. हा ग्रंथ साहित्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून मराठी भाषेत घुसडलेले उर्दू फार्सी व परकीय शब्द न वापरता अस्सल देशी मराठी शब्द वापरून कृष्णदयार्णव यांनी मराठी भाषेला या हरीवरदा टीकेतून मोठीच भेट दिली आहे.

कृपया ऐकून अभिप्राय द्या

चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका

संकल्पना व अभिवाचन
डॉ प्रशांत धर्माधिकारी

भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी

भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी


ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या 24 व्या व्याख्यानाचे पुष्प जेष्ठ भाषातज्ञ व विद्वान साहित्यिक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी गुंफले. "भारतातील भाषांची विविधता व लोकशाही" या विषयावर हे व्याख्यान झाले. कै.डॉ. वा ना बेडेकर यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ सुरू झालेली ही व्याख्यानमाला म्हणजे ठाण्यातील संस्कृतीक अवकाशाची ओळख आहे. 

 भाषा रिसर्च फाउंडेशन , आदिवासी अकॅडमी तसेच पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थात्मक कामातून सर्वांना परिचित असलेले डॉ गणेश देवी हे भाषांच्या संवर्धनाचे काम करतात.  त्यांना त्यांच्या "आफ्टर  आम्नजिया" या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे . तसेच सार्क रायटर्स फाउंडेशन अवॉर्ड,  प्रिन्स क्लास अवॉर्ड व दुर्गा भागवत स्मृती पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. 

व्याख्यानाच्या सुरुवातीला आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक म्हणाल्या की प्रत्येक जण आपल्या परीने विश्वामित्र सारखी प्रतिसृष्टी निर्माण करत असतो . भाषेकडे पाहण्याची डोळस दृष्टी वृद्धिंगत होण्याची गरज डॉ नाईक यांनी अधोरेखित केली. त्यांनी डॉ गणेश देवी यांच्या कामाचा उल्लेख करत जमिनीवर राहून काम करण्याचे महत्त्व सांगितले.  क्रियाशील राहून विद्वत्तेच्या व ज्ञानदानाच्या कामात हिरीरीने भाग शिक्षण क्षेत्रातील लोकांनी घ्यावा असा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी डॉ गणेश देवी यांच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली. 

डॉ गणेश देवी आपल्या व्याख्यानात म्हणाले की समाजाला पर्यावरणाच्या ऱ्हासाची आता जाणीव झाली आहे. मात्र तशीच जाणीव भाषेच्या बाबतीतही करून द्यावी लागेल . येत्या दोनशे वर्षात सर्व भाषा नष्ट होतील असे ते म्हणाले. पुढील तीस ते चाळीस वर्षात जगातील सहा हजार पैकी चार हजार भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून भारतातील सहाशे भाषांचा त्यात समावेश आहे. भाषा नष्ट झाल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा वैचारिक संचिताचा ऐवज नष्ट  होतो.  विशेष करून सध्याच्या पिढीला बोली भाषा व मातृभाषांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखाद्या देशाची संस्कृती व चिंतन याचा एकत्रित अविष्कार म्हणजे ती भाषा असते. मात्र  इंग्रजी सारख्या भाषांचे आक्रमण भारतीय भाषांवर होऊन त्या आक्रसत चालले आहेत. त्यासोबतच भारतात असलेल्या अनेक बोलीभाषा व त्या भाषांमधून प्रकट होणारे सांस्कृतिक संचित आपण जपले पाहिजे असे डॉ गणेश देवी म्हणाले. पूर्वी एखाद्या पिढीचे सांस्कृतिक संचित हे ग्रंथालय व संस्थात्मक पायाभरणी यातून पुढच्या पिढीत हस्तांतरित होत होते. मात्र स्मृती साठवण्याचे महत्त्वाचे कार्य आपण कंप्यूटर व मशीन ला दिले आहे. त्यामुळे भाषा विरहित समाजाची निर्मिती होईल की काय असा धोका त्यांनी व्यक्त केला. 

भारतीय सिद्धांत व पाश्चात्य विचार परंपरा यांचा साकल्याने अभ्यास करून तौलनिक अभ्यास करण्याची गरज डॉ गणेश देवी यांनी व्यक्त केली .भाषा साहित्य व मानव्यविद्या शाखांमध्ये होणारे संशोधन  हे या दर्जाचे असावे असे ते म्हणाले . व्यक्तीने कुठल्या एका भाषेचा अभिनिवेश न ठेवता अधिकाधिक भाषा अवगत करण्यासाठी धडपड केली पाहिजे . कारण प्रत्येक नवी भाषा हा एक नवी सांस्कृतिक अवकाश दाखवणारा महत्त्वाचा बिंदू असतो. आपले चित्त व सभोवताली असलेल्या विश्वाला जोडणारा एकमेव सेतु म्हणजे भाषा आहे असे महत्त्वाचे विधान डॉ गणेश देवी यांनी केले. सभोवतालच्या परिस्थिती ची उकल आपणास भाषेच्या माध्यमातून होते त्यामुळे भाषेचे संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे . मातृभाषेत दिलेले शिक्षण हे अधिक परिणामकारक असते व व त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे डॉ देवी म्हणाले.

या व्याख्यानमालेचे संयोजन वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पुरूषोत्तम धर्माधिकारी यांनी केले . तसेच तांत्रिक सहाय्य प्रा. प्राची नितनवरे व  प्रा मानसी जंगम यांनी केले.  हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला . तसेच याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करण्यात आले.  या व्याख्यानास विद्यार्थी संशोधक व प्राध्यापकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

रविवार, 21 जून 2020

आषाढस्य प्रथम दिवसे: महाकवी कालिदासदिनानिमित्ताने

आषाढस्य प्रथम दिवसे: 
महाकवी कालिदासदिनानिमित्ताने

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो यावर्षी हा दिवस 22 जून रोजी येत आहे त्यानिमित्ताने कालिदासाच्या एकूणच साहित्यिक अवकाशाचे चिंतन व्हावे असा मानस सर्वांच्या मनात असतो. महाकवी कालिदासाने लिहिलेल्या "मेघदूत" या खंड काव्याच्या दुसऱ्या श्लोकात 
"आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लीष्ट सानुम्
वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श ।।" 

असा उल्लेख येतो . कालिदासाच्या जन्मतिथि निमित्ताने विद्वानांमध्ये सहमती नाही. कालिदासाच्या जन्माचा काळ निश्चित नसल्यामुळे त्याने मेघदूतात वर्णन केलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिन साजरा केला जातो.  एखाद्या साहित्यिकाच्या कृतीतील उल्लेखावरून त्याचा जन्मदिन साजरा करणे ही कल्पना खूपच छान आहे. 

मेघदूतामध्ये कालिदासाने निसर्गाचे खूपच सुंदर वर्णन केले आहे . मेघदूताचा प्रभाव भारतीय भाषांमधील अनेक कवींच्या साहित्यावर तसेच गटे , मॅक्समुलर इत्यादी विश्व कवींच्या साहित्यावर देखील पहावयास मिळतो. प्रो. मॅक्सम्युलर लिहितात

"Rarely has a man walked our earth who observed the phenomena of living nature as accurately as he, though his accuracy was off course that of a poet and not that of a scientist." 

कालिदासाने संस्कृत साहित्याची दालनं एकाहून एक अशा मौल्यवान रत्नांनी भरवली आहेत

अद्यापि यस्य गायन्ति कीर्ती:  कविवरा अपि।
नमामि कालिदासम् तं  भारतीयं महाकवीम्।।

भारतीय संस्कृतीला अखिल जगतात मूर्धन्य स्थानी प्रस्थापित करण्यात महाकवी कालिदासांचे श्रेष्ठत्व समावलेले आहे.  "कविकुलगुरू" या बिरुदाचा मानकरी असलेला कालिदास म्हणजे भारतीय कवींच्या शिरपेचातला मुकुटमणी म्हणता येईल . आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते .महाकवी कालिदासाने आपल्या जगद्विख्यात मेघदूत या काव्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरूवातीचे नितांत सुंदर वर्णन केले आहे

मराठीतील ज्येष्ठ कवी वसंत बापट यांनी आपल्या "जीवीचा जिवलग कालिदास " या लेखामध्ये असं म्हटलं आहे की 'काही कवी प्रेमिकाच्या दृष्टीतून निसर्गाकडे पाहतात. काही त्याच्याकडून शिकवण मिळण्याची अपेक्षा करतात. 'Books in the running Brooks'   अशी स्वतःची मनोभूमिका दर्शवतात. 'Teach me blithe spirit, bird thou never wert'. असे सरळ सरळ आवाहन करतात.  'लवर्स फिलॉसॉफी " Lovers Philosophy" सारख्या कवितेत सृष्टीमध्ये भरून असलेली प्रणयक्रिडा ब्रिटिश कवी शेले  चविष्टपणे सांगतो.  पण कालिदासाची गोष्टच निराळी.  आपल्या जीविताच्या प्रवासात प्रत्येक वळणावर आणि वाकणावर त्याला निसर्गाचा नवा नवा प्रत्यय येत राहतो."! 

मेघदूतात महाकवी कालिदासाने एक हृदयस्पर्शी कथा रेखाटली आहे. हेमामाली आणि विशालाक्षी या नूतन विवाहित यक्ष दाम्पत्याची ही कथा आहे.  आपला स्वामी  कुबेराच्या सेवेमध्ये प्रमाद घडल्यामुळे कुबेराने हेममाली ला एक वर्षाच्या विजनवासाची शिक्षा दिली.  नुकतंच लग्न झालेल्या आपल्या प्रिय पत्नी पासून दूर रामगिरी पर्वतावर यक्ष एक वर्षासाठी दूर आला . प्रियाविरहाचा हा काळ रामगिरी पर्वतावर कंठत असताना आठ महिने कसेबसे गेले व पावसाळ्याची सुरुवात झाली. हाच तो आषाढाचा पहिला दिवस . "आषाढ का एक दिन" या नावाचे  हिंदी साहित्यिक मोहन राकेश यांचे नाटक ही प्रसिद्ध आहे .आपल्या प्रिय पत्नीची आकाशात दाटलेल्या मेघाकडे बघून यक्षाला खुप आठवण येते आणि तो त्या मेघा कडे उत्सुक होऊन पाहू लागतो. त्याची अवस्था "उपरि घनं घनरटितं, दूरे दयिता किमेतद आपतितम्। "अशी होते. 

कुटजकुसुमांची उधळण करून अतिशय प्रिय वाक्याने तो मेघाला बोलू लागतो . विरह दुःखाने पीडित व असहाय्य झालेला यक्ष पत्नीच्या आठवणीने उतावीळ होऊन मेघालाच आपला दूत बनवतो आणि हे मेघदूत नावाचे अतुल्य  काव्य कालिदासाच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्म घेते.

 रामगिरी पर्वतावर अर्थात सध्याचे रामटेक येथे असलेला हा यक्ष मेघाला आपल्या पत्नीकडे संदेश पोचवण्यासाठी जाण्याची विनंती करतो. तसेच त्याच्या अलकावती नगरीचा मार्ग देखील सांगतो. यक्षाची राजधानी असलेल्या अलकापुरी नगरीत त्याचे घर आहे वाटेत जाताना आलेल्या नयनरम्य निसर्ग चित्रणाने दृष्टीचे पारणे फिटते.  विदिशा नगरी व तेथून उज्जैनी नगरीत जाण्याचे मेघाला यक्ष सांगतो. उज्जैन नगरीत महाकाल मंदिराच्या दर्शनानंतर निरविंध्या या नदीचे पाणी पिऊन तू अवंती नगरीत जा तुला वाटेत मयूर रस्ता दाखवतील असेही यक्ष मेघाला सांगतो.
 " हे मेघा तू आल्यामुळे ज्यांचे पती व्यापारासाठी गेले आहेत  अशा स्त्रियांना त्यांच्या आगमनाची चाहूल लागेल. हंसाचासुद्धा प्रणय काळ पावसाळ्यात तुझ्या आगमनामुळे झाल्यामुळे ते तुला त्यांच्या थव्याची माला करून घालतील." असे कालिदास म्हणतो.

मेघाच्या घनश्याम अशा अंगावर मधूनच दिसणारा इंद्रधनुष्य शोभून दिसेल व मेघ मोरपीस धारण करणाऱ्या गोपाळकृष्णासारखा सुंदर दिसेल असे यक्ष मेघास सांगतो. मेघदूतातील मार्ग हा महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या रामटेक पासून ते उत्तरेकडील अलकावती नगरी पर्यंतचा आहे . या संपूर्ण मार्गाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की कालिदासाला भारताच्या भूगोलाचा तसेच साधनसंपत्ती , नदी, पर्वत ,निसर्गाचे सौंदर्य याचा खूप व्यासंग होता .या काव्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा भावही प्रकट होतो.  सध्या झालेले उघडेबोडके पर्वत व पर्यावरणाचा ऱ्हास कालिदासाला अपेक्षित नाही. कालिदासाला वृक्षांनी सजलेले व फळाफुलांनी वेलीनी नटलेली सुजलाम सुफलाम अशी वनसृष्टि अपेक्षित आहे. कालिदासाच्या मेघदूतात उल्लेख झालेल्या फळांचा फुलांचा वेलींचा व निसर्गाच्या चित्रणाचा स्वतंत्र अभ्यास करता येईल

यक्ष राहत असलेल्या अलकापुरी चे वर्णन तर डोळ्यांना थक्क करणारे आहे. 

"जेथे डोळ्याला पाणी हे केवळ आनंदाश्रू मुळे येते, जेथे ताप हा केवळ प्रियेच्या संगमामुळे येतो , जेथे कलह हा केवळ प्रिय सखीच्या प्रणयाशिवाय होत नाही,  आणि जिथे यौवनाशिवाय दुसरे कोणतेही वय नाही" अशा अलका नगरीचे वर्णन कालिदास करतो

 मेघाला यक्षाच्या पत्नीला संदेश द्यावयाचा आहे व अलका नगरीतील यक्षा चे घर मेघ कसा ओळखेल यावर कालिदास यक्षाच्या घराचं खूप सुंदर वर्णन करतात.  
 तत्रागारं धनपतिगृहादूत्तरेणास्मदीयं
 दुरालक्ष्यम् सुरपतिधनुशचारुणा तोरणेन।
 यस्योपांते कृतकतनय: कांतया वर्धितो मे
 हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमंदारवृक्ष: । 
"कुबेराच्या घराच्या उत्तर दिशेला माझे घर तुला दुरूनच दिसेल. माझ्या घराला तोरण म्हणून इंद्रधनुष्याची योजना केली आहे .माझ्या घरासमोर माझ्या पत्नीच्या हातांनी पाणी पिऊन पुष्ट असा व आपल्या फुलांचा गुच्छामुळे वाकलेला बाल मंदार वृक्ष आहे "

शांता शेळके या ज्येष्ठ मराठी कवयित्री यशाच्या घराच्या वर्णनाच्या लोकांचे सुंदर मराठीत समश्लोकी भाषांतर केले आहे ते असे

" कुबेर सदना जवळी आहे उत्तरेस ते भवन आमुचे
  दुरून भरते नयनी कारण तोरण दारी इंद्रधनुचे 
  प्रियपुत्रासम सखीने माझ्या वाढविलेला तरु अंगणी
   मंदाराचा गुच्छ जयाचे सहज करा मधी येती झुकुनी"

अशा या घरात विरहामुळे व्याकुळ अशी माझी पत्नी आहे असे यक्ष मेघाला सांगतो. कालिदासाने यक्षाच्या पत्नीचे केलेले वर्णन हे विरहातूर अशा नायिकेचे वर्णन आहे.

" विरहामुळे मितभाषी झालेली रडून डोळे सुजलेली व पतीची आठवण करत आणि दिवस मोजत असलेल्या माझ्या पत्नीला पाहून हे मेघा तुला तिची ओळख पटेल. आपल्या पुढ्यात असलेल्या विणेवर माझ्या नावाने युक्त अशा पदांचे गायन करणारी ,अश्रू विणेवर पडल्यामुळे ओल्या झालेल्या तारेला कसेतरी सावरत ती पुन्हा पुन्हा पद  गुणगुणत बसली असेल. 

प्रख्यात मराठी कवयित्री शांता शेळके यांनी मेघदूताचा भावानुवाद केला आहे शांताबाईंच्या अनुवादात  उत्तरमेघातील काही श्लोक मुळातून वाचण्यासारखे आहेत . मराठी भाषेमध्ये कालिदासाच्या संस्कृत श्लोकांची समश्लोकी त्यांनी लिहिलली आहे.  अलका नगरीतील यक्षाचे घर,  घरा भोवतालची सुंदर बाग, यक्ष पत्नी यांचे वर्णन शांताबाई खूप छान करतात. त्यांनी केलेले विरही यक्षपत्नीचे वर्णन असे आहे: 

"मलिनवसनी वा मांडीवरती वीणा घेऊन असेल बसली 
नाव गुंफिले जयात माझे गीत गावया आतुर झाली 
गाताना पण नयनी आसू  ओघळती ते  तारानवरती
 स्वये योजिलेल्या तानांची ही सखीला होते, हाय !विस्मृती!
 उंबरठ्यावर फुले मांडुनी एक एक ती दिवस मोजिते 
 किती विरहाचे मास राहिले पुन्हा पुन्हा अजमावुनी बघते रमते तेव्हा कल्पनेत मम सहवासाची चित्रे रेखून
  विरहा मध्ये रमणी बहुधा असेच करिती मनोविनोदन।"

हे मेघा अशा माझ्या भेटीला आतुर असलेल्या पत्नीला माझा संदेश सांग , की  मी अजून चार महिन्यांनी कार्तिक शुक्ल एकादशीला देवदीपोत्सवादिवशी परत येईन. तोपर्यंत तू माझी वाट पहा. पती खूप दिवस झाले परत येत नाही असे समजून कुठलाही वाईट विचार मनात येऊ देऊ नको. असा संदेश मेघा कडे यक्ष देतो.

मानवी संबंधांचे सत्य व नात्याची घट्ट वीण कालिदास आपल्या वाङ्मयात सुंदरपणे चित्रित करतो.  दोन प्रेमी दूर राहिले तरीही त्यांच्यातील प्रेम हे वाढत जाते हा संदेश कालिदासाला यात द्यायचा आहे.  भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ ,काम,  व मोक्ष या चार पुरुषार्थांच्या पूर्तीसाठी गृहस्थाश्रम सांगितला आहे . त्यात दाम्पत्य जीवनात एकमेकांवरील विश्वास ,ज्याला म्यूच्यूअल अंडरस्टँडिंग असे आपण म्हणतो, त्याची वीण घट्ट करण्यासाठी मेघदूताचा सारख्या गीतीकाव्याची रचना झाली

 अंत : पुरातील गुजगोष्टी पासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग , शृंगार व वैराग्य , काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉ के ना वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणं वाल्मिकीच्या नीतीला आणि व्यासांच्या बुद्धीला कालिदासाने सौंदर्याची जोड दिली. व्यासांनी सत्य, वाल्मिकीने शिव,  तर कालिदासाने सौंदर्य यांची प्रचिती प्रामुख्याने दिली . व्यास ,वाल्मिकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचं सार साठवलेलं आहे असं महर्षी अरविंद म्हणतात ते याचसाठी.

सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या व विघटनवादी प्रवृत्तींच्या वाढीच्या या काळात भारताच्या संस्कृतिक एकात्मतेचे एक प्रतीक म्हणून कालिदास महत्वपूर्ण आहे. भारताच्या बहुतांशी भागांची वर्णन त्याच्या साहित्यात आढळतात. भारतीय संस्कृतीचे म्हणून जे आदर्श आहेत ते कालिदासाने अभिव्यक्त केले आहेत व म्हणूनच केरळ पासून काश्मिर पर्यंत सर्वांनाच कालिदास पूज्य वाटतो. 'आपला' वाटतो.

@डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी

साप्ताहिक विवेक ने वरील लेख छापला आहे 


गुरुवार, 11 जून 2020

ठाणे कॉलेजात बळजबरीने विलगीकरन कक्ष

ठाणे कॉलेज परिसरात बळाचा वापर करून व कॉलेज प्रशासनाला विचारात  न घेता विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी कॉलेज अधिग्रहित करण्याची बातमी प्रसारमाध्यमात पाहून खूप वाईट वाटले. सत्तालोलुप अधिकारशाहीची मिजास सर्वथा चुकीची आहे.

विद्या प्रसारक मंडळाचा परिसर हा "ज्ञानद्वीप " नावाने प्रसिद्ध आहे. ठाण्याचे सांस्कृतिक संचित या संस्थेने घडवले आहे. साधारणतः 15 हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेतात.  त्यांच्या निकालाचे काम सुरू असताना अशी अचानक कार्यवाही प्रशासनाने करावयास नको होती.  डॉ बेडेकरांची व त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधीलकी संपूर्ण ठाण्यातील जनता जाणते. त्यांनी उभं केलेलं हे शैक्षणिक संकुल संस्कार व मूल्यशिक्षणात मानबिंदू आहे. मात्र याचा कुठलाही विचार न करता अधिकारांचा गैरवापर करून तारतम्यविहीन वागणुकीचा निषेध केला गेला पाहिजे. 

भारतात एक काळ असा होता की, दुष्यंत राजसारखे चक्रवर्ती सम्राट कण्व मुनीच्या आश्रमात प्रवेश करताना राजपोशाख काढून मुनिवेशात प्रवेश करत असत. कालिदासाने आपल्या अभिज्ञान शाकुंतल नाटकाच्या पहिल्या अंकात राजाने आपल्या राज्यातील शैक्षणिक संस्थांशी केलेला राजव्यवहार अचूकपणे टिपला आहे. 

दुष्यंत राजा कण्व मुनींच्या आश्रमात प्रवेश करताना आपल्या सारथ्यास म्हणतो 

"तपोवन निवासीनाम् उपरोधो मा भूत। विनीतवेशेन प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम। "

अर्थात आपण गुरुकुलात प्रवेश करताना आपला रथ , घोडे व शस्त्र बाहेर ठेवून "विनीत वेषात" अर्थात साधे कपडे घालून प्रवेश करू. आपल्या मुळे तपस्वी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये. 

पुणे विद्यापीठात इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर शिक्षण घेताना ऐकलं होतं की, बॅरिस्टर जयकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असताना पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान म्हणून कार्यक्रमास येणार होते. येण्यास त्यांना विलंब झाला. कार्यक्रम वेळेत सुरू झाला होता. तेंव्हा ते कुलगुरू जयकरांच्या पायावर डोकं ठेवत नेहरूंनी माफी मागितली. शिक्षण संस्थांचा व त्यातील गुरुजनांचा सन्मान यातून अधोरेखित होतो. 

राहत इंदोरी या प्रसिद्ध उर्दू शायराचा एक प्रसिद्ध शेर आहे

जो आज साहिबे मसनद है , कल नही होंगे। 
किरायेदार है, जाती मकान थोड़ी है।

अर्थात आज जे (साहिबे मसनद)
अधिकार पदावर बसले आहेत त्यांना हे कळत नाही की आपण किरयादार आहोत. आपण इथे दीर्घकाळ राहणार नाहीत. ही काही आपली पर्सनल प्रॉपर्टी नाही

सत्तेने नेहमी ज्ञानदान करणाऱ्या संस्थांना ललामभूत मानलं. मात्र आज काळ एवढा बदलला की एखादी संस्था जणूकाही अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणाला पोलिसी खाक्या दाखवून अधिग्रहित करतात त्याप्रमाणे धाकदपटशा दाखवून घेतली जाते. शिक्षण ही धोरण कर्त्यांची व प्रशासनाची प्राथमिकता नाही हेच यातून दिसते. जॉन ऍकटन (1834-1902) या प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकाराने म्हटले आहे की, Power tends to corrupts, and absolute power corrupts absolutely". 

इतिहासाच्या पुस्तकात प्लेगची साथ व इंग्रजी सोजिरांची जुलमी वागणूक वाचली होती. तीच मिजास जर आपल्या प्रशासनात बसलेल्या लोकांची असेल तर शिक्षणाचे व शिक्षणसंस्थाचे पावित्र्य टिकणार नाही. 'विद्या ददाति विनयं" असं लहानपणी वाचलं होती. विद्या विनय देते म्हणे, मात्र विद्यासंपन्न, धनसंपन्न व अधिकार संपन्न व्यक्तींनी आपल्याच पुढच्या पिढीची आधुनिक तीर्थक्षेत्रे असलेल्या शिक्षणसंस्थांची काळजी मोठ्या विनयाने घ्यावी ही सामान्य नागरिकांची इच्छा असते. या मूलभूत जीवनमूल्यालाच पायदळी तुडवले जात असेल तर भविष्य खूप चांगले आहे असे म्हणता येणार नाही. 


डॉ प्रशांत धर्माधिकारी
साहाय्यक प्राध्यापक
जोशी बेडेकर महाविद्यालय
ठाणे

https://www.lokmat.com/thane/fear-thane-college-benches-worth-lakhs-getting-damaged-due-rain-a301/ 

ठाणे काँलेजचे लाखोंच्या किमतीचे बेंच पावसात भिजून  खराब होण्याची भीती

स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यप्रतिभा फेसबुक लाईव्ह



लॉकडाऊन विशेष वंटास मुंबई सादर करित आहे, 'थेट फेसबुक' लाईव्ह

विषय : "स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यप्रतिभा"

वक्ते : डॉ. प्रशांत धर्माधिकारी (सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे)

या काव्य प्रतिभेमध्ये सामिल होण्यासाठी तुम्ही, वंटास मुंबईच्या फेसबुक पेजवरून जोडले जाऊ शकता...

आज सायंकाळी : 6.00 वा

https://www.facebook.com/VantasMumbai/videos/792947414568149/

बुधवार, 10 जून 2020

उगवत्या सुर्याच्या देशातून: जपानच्या अभ्यासदौऱ्यानिमित्ताने


"उगवत्या सुर्याच्या देशातून" हा माझा जपान दौऱ्याचे अनुभवकथन करणारा लेख "दिशा" मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकात प्रकाशित झाला आहे. सोबत लिंक व लेख देत आहे.

https://www.vpmthane.org/Disha/disha_index.htm


"उगवत्या सुर्याच्या देशातून

बुधवार, 3 जून 2020

ऑक्सफर्ड केम्ब्रिज व लंडन अभ्यासदौरा मे 2018

लंडन डायरी
 3जून 2018 

काल लंडनदौरा सम्पवून भारतात परत पोचलो. मागचे पंधरा दिवस म्हणजे स्वप्नवत अनुभव होता. ही तशी माझी दुसरी लंडनवारी. या वेळी डॉ बेडेकरांमुळे जाता आलं. ज्ञानपीपासेनी ओतप्रोत भरलेल्या डॉ बेडेकर या अवलिया माणसाबद्दल काय लिहावं. शैक्षणिक संस्था अभ्यासाच्या व संशोधनाच्या विचारपीठ व्हाव्या म्हणून जगभर फिरणारे डॉ बेडेकर म्हणजे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. त्यांच्या संपर्कात आल्यावर जगाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळत जाते . 

जैसे डोळा अंजन भेटे।
 मग दृष्टीशी फाटा फुटे।।

 असं ज्ञानेश्वर माऊली म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांना काहीतरी नवं देण्याची डॉ बेडेकरांची तळमळ नेहमी जाणवत राहते. काही माणसं आयुष्यात पूर्वसंचित असल्याशिवाय मिळत नाहीत. डॉ विजय बेडेकर हा असा एक अवलिया माणूस. जे जे उन्नत उदात्त व चांगलं त्याचा ध्यास डॉ बेडेकरांनी घेतला आहे. विद्याप्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या इंग्लडच्या अभ्यास दौरा हा एक उदत्ततेच्या शोधयात्रेचा महत्वाचा टप्पा. 

या शैक्षणिक सहली निमित्त अनेक विद्यार्थी व अभ्यासक मित्रांशी संवाद झाला. तीन हजार ब्रिटिशांनी येऊन 33 करोड भारतीयांना जवळपास दीडशे वर्षे लुटलं याचं नेमकं गमक काय हे या दौऱ्यात समजलं. अनुशासन, दस्तऐवजीकरण ,समयसूचकता, व व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्वाचं ही धारणा या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेता येतील. पाच मिनिटं संसदेत उशिरा पोचल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा फक्त इंग्लंड मध्ये च होऊ शकतो. या दौऱ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत धमाल करण्याचा योग आला . पाच महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, सोबत होते. कुणाल, संजना, अनिशा ,इनारा व इंद्रनील हे कॉलेजचे विद्यार्थी सोबत होते. संतोष मिर्लेकर मित्राच्या भूमिकेत तर डॉ बेडेकर व डॉ आगरकर यांनी या दौऱ्यात शैक्षणिक आयाम विकसित करण्यासाठी मुलांना प्रेरित केले. 

ऑक्सफर्ड व केम्ब्रिज येथे आम्ही युथ हॉस्टेल मध्ये राहिलो. युवकांनी घरातून व आपल्या देशातून बाहेर पडावं व आजूबाजूचे जग सताड उघड्या डोळ्यांनी पहायला हवं म्हणून जगभर 4000 वसतिगृह चालवणारी YHA युथ हॉस्टेल ही संस्था. या इंग्लंड दौऱ्यात रोजनिशी वाचन हा एक फार छान उपक्रम असतो. प्रत्येकाला रोजची डायरी लिहावी लागते व त्याचे सामूहिक वाचन होते. लंडन मध्ये आम्ही YMCA या भारतीय वसतिगृहात राहतो. हा भाग लंडनच्या हार्ट ऑफ सिटी म्हणावा लागेल . याच वेळी लंडनस्थित काही भरतीय अभ्यासकांना डॉ बेडेकर बोलावतात.  

आपली संस्कृती जपुन ठेवुन इंग्लंड मध्ये काम करणारी डॉ आंबेकर व डॉ सौ आंबेकर सारखी दाम्पत्य दुर्मिळच . त्यांनीही एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना भेट दिली.

 ज्या भारतीय क्रांतिकारकांनी इंग्लडच्या मातीत राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम केलं त्यांच्या स्मृती ताज्या करण्यासाठी आम्ही त्यात्या ठिकाणी भेटी दिल्या त्यात विलक्षण म्हणजे वीर सावरकर लंडनमध्ये ज्या इंडिया हाऊस मध्ये विद्यार्थी असताना राहत होते तिथे आम्ही गेलो, टिळक इंग्रज सरकारने त्यांच्या वर केलेल्या खटल्याला उत्तर द्यायला लंडनमध्ये ज्या वास्तूत राहिले , जिथे मदनलाल धिंग्रा यांनी करझन वाईली ला गोळ्या झाडल्या ती जागा अशा अनेक.... 

लंडन मध्ये ब्रिटिश म्युझियम, ब्रिटिश लायब्ररी हे दोन मानबिंदू पाहिले. चार्ल्स डार्विन या थोर संशोधकाच्या घरी गेलो होतो. मानवाच्या उत्क्रांती चे सिद्धांत मांडणाऱ्या डार्विनचे 22 एकराच्या विस्तीर्ण जागेतले घर ब्रिटिश सरकारने स्मारक म्हणून घोषित केले आहे. शेक्सपिअर चे स्ट्रेटफर्ड अपॉन एव्हन व सेंट पॉल अशा स्थळांना भेटी दिल्या. 

आमचा दौरा 15 ते 25 मे 2018 या काळात झाला . मी मात्र डॉ बेडेकरांसोबत आठ दिवस अधिक राहिलो. या काळात आमचा मुक्काम डॉ मधुकर आंबेकर व डॉ विदुला आंबेकर या दाम्पत्याकडे नॉर्थवूड येथे झाला. आंबेकर प्रभृती हे मागच्या 40 वर्षांपासून लंडन निवासी आहेत. इथल्या भारतीय लोकांशी यांचं जिव्हाळ्याच नातं. त्यांनी माझे व डॉ बेडेकरांनी दोन व्याख्यान आयोजित केली. 

लंडनमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी " Western Scholars of Upanishads" या विषयावर बोलण्याचा योग आला. हा विषय डॉ बेडेकरांनी मला सुचवला होता. व्याख्यानं चांगली झाली. डॉ बेडेकर "Manipulation of Indian Education in 19th Century" या विषयावर बोलले. रामकृष्ण मठाचे लंडन येथील बकिंगहॅमशायर या परिसरातील वेदांत सेंटर पाहण्यासाठी गेलो होतो. स्वामी सर्वस्थानंद यांची भेट व चर्चा झाली. 
या वेळी मास मीडिया विभागाचे चार विद्यार्थी सोबत असल्याने सम्पूर्ण सहल डीएसेलार कॅमेरा व ट्रायपॉड च्या मदतीने रीतसर छायांकित झाली. अनुभवांनी खूप समृद्ध होता आलं ..... 

डॉ प्रशांत धर्माधिकारी 
सहाय्यक प्राध्यापक 
जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे 
9422495094











सोमवार, 1 जून 2020

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता 

28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३७ वी जयंती जगभर साजरी झाली . यानिमित्त त्यांच्या काव्याप्रतिभेवर प्रकाश टाकणारा डॉ प्रशांत धर्माधिकारी यांचा लेख 
-------- 

28मे 2019 रोजीचा लंडन येथील फोटो


‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रतिज्ञा घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारतीयांसाठी एक मोठा उर्जेचा स्त्रोत आहे. त्यांची १३७ वी जयंती २८ मे रोजी जगभर साजरी केली जाते. इंग्रजी राजवटीपासून भारताची मुक्तता करण्यासाठी चालवलेल्या क्रांतिकारी चळवळीचे अग्रदूत म्हणून सावरकरांचे योगदान मोठे आहे. चाफेकर बंधूना झालेल्या फाशीच्या शिक्षेचा कोवळ्या वयातील सावरकरांवर मूलगामी परिणाम झाला. सशस्त्र क्रांती, बलोपासना, स्वदेशी, राष्ट्रप्रेम इत्यादी विषयांवर सावरकरांची अगाध श्रद्धा होती. लोकमान्य टिळकांना त्यांनी मनोमन आपले गुरुपद बहाल केले होते. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते तर एक महाकवी, भाषाशास्त्रज्ञ, भाषाशुद्धी चळवळीचे प्रणेते, नाटककार, कथा, लेखक, वक्ते व दार्शनिक होते. सावरकरांची कविता बहुप्रसवा होती. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी ‘श्रीमंत सवाई माधवराव’ यांच्यावर फटका लिहिला व वयाच्या १५ व्या वर्षी ‘स्वदेशीचा फटका’ लिहिला. १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘समग्र सावरकर वाङमय’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे कि, ‘सावरकरांचे काव्य हे जीवनात प्रतिभेतून निर्माण झालेले असून त्यांच्या कोणत्याही चार स्फुट कविता घेतल्या तरी महाराष्ट्रातील नामवंत कवीत त्यांची अग्रस्थानी गणना होऊ शकेल. त्यांनी अनेक विषयांवर कविता लिहिल्या असून त्याची प्रत्येक कविता देशप्रेमाने ओथंबलेली , वीररसाने भरलेली, प्रतिभेच्या विपुलतेने चमकणारी आणि तत्वज्ञान व ध्येयवाद यांचा उद्घोष करणारी असून महाकवीच्या कोणत्याही कसोटीवर विचार करताना स्वा सावरकरांना महाकवी हेच विशेषण योग्य ठरते.’ १० नोव्हेंबर १९५० च्या दैनिक काळ च्या दिवाळी अंकात नोंदवले आहे की, महाकवी हे उपपद एखाद्या कवीस दोन अर्थानी लावतात, एक, ज्याची प्रतिभा उज्ज्वल व जो जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडवितो तो महाकवी किंवा, जो महाकाव्य(EPIC)नावाचा काव्यप्रकार रचतो तो. पहिल्या अर्थी शेक्सपिअर, भवभूती, नि बाण यांना महाकवी म्हणतात. दुसर्या अर्थी महाकाव्य लिहिणारे टासो, माघ, भारवी, श्रीहर्ष इत्यादींना महाकवी म्हणतात. सावरकर या दोन्ही अर्थी महाकवी आहेत ‘कमला’ या महाकाव्याची रचना करताना सावरकरांनी ‘वैनायक’ या विशेष वृत्ताची निर्मिती केली. मराठी भाषेच्या काव्यात्म जाणीवेस वैनायक हा सुंदर नजराणा आहे. सावरकरांची संपूर्ण कविता सुमारे १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता या नावाने त्यांची कविता १९४३ साली प्रकाशित करण्यात आली आहे. त्यांनी ‘उ:शाप’, ‘सन्यस्त खड्ग’ व ‘उत्तरक्रिया’ अशी तीन संगीत नाटके लिहिली. आजही सावरकरांनी लिहिलेली ‘ शतजन्म शोधिताना’ , ‘मर्मबंधातली ठेव ही’ इत्यादी नाट्यपदे मोठ्या रसिकपणे गायिली जातात. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. स . ग. मालशे म्हणतात कि, “ मिल्टन सारखी पारंपारिक उपमा, रूपके रचावी सावरकरांनीच. त्यांच्या भावना जेव्हा कोमल, अगदी हळव्या बनतात तेंव्हा त्यांचे शब्दरूप महाकवीच्या प्रासादिक वाणी प्रमाणे आविष्कृत होते. ‘सांत्वन’ मधल्या ओव्या किंवा ‘कि घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ‘ ह्या सारखे श्लोक व्यास वाल्मिकींच्या, श्रीधर –मुक्तेश्वरांच्या वाणी सारखे दिव्य आणि प्रासादिक वाटतात. सावरकरांनी आर्या, शार्दुलविक्रिडीत, इंद्रवज्रा, वसंततिलका इत्यादी वृत्त चपखलपणे कवितेत वापरले आहेत. त्यांनी लिहिलेली ‘श्री टिळक स्तवन ‘ ही आर्यावृत्ताचा अजोड नमुना आहे. १९०२ साली सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी असताना ‘आर्य संघ’ साठी दर आठवड्याला म्हणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ ही आरती लिहिली. पोवाडा, फटका, आदि काव्यप्रकारांसह सावरकरांनी वीर रसा बरोबरच शृंगार देखील सिद्धहस्तपणे हाताळला आहे. आपला मुलगा प्रभाकर हा लहानपणीच वारला तेंव्हा सावरकर लंडन मुक्कामी होते. तेव्हा त्यांनी ‘प्रभाकरास’ नावाची कविता पुत्र स्नेहाने दु:खगद्गद होऊन लीहिली. ही कविता सावरकरांनी आपल्या ‘ शिखांचा इतिहास’ या ग्रंथाला अर्पणपत्रिका म्हणून लिहिली. १९०६ साली कायद्याची पदवी घेण्यासाठी सावरकर इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी बोटीने समुद्र प्रवास करताना प्रियजनांचा विरहाला मुखरित करीत ‘सुनील नभ हे सुंदर नभ हे’ ही कविता लिहिली. १९०९ साली ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकरांनी ‘सागरा प्राण तळमळला’ हि अजरामर कविता लिहिली. त्यात ते म्हणतात की ‘नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरतभूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी’ ‘सांत्वन’ व ‘माझे मृत्युपत्र’ या दोन उर्जस्वल कविता सावरकरांच्या लेखणीतून लंडन वास्तव्यात मूर्त झाल्या. या दोन्ही कविता त्यांनी आपल्या वहिनींना उद्देशून लिहिल्या असून ह्या कविता म्हणजे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा कळस आहे. माझे मृत्युपत्र या कवितेत सावरकर लिहितात की जर आम्ही सात भाऊ असतो तरीही त्या सर्वांनी देशसेवेसाठी प्राणार्पण केले असते. हे मातृभूमी तुजला मन वाहियेले वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले तुतेची अर्पिली नवी कविता रसाला लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला सावरकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते आपली कविता मातृभूमीच्या मुक्तीसाठी अर्पण करतात. त्यांच्यासाठी मातृभूमीपेक्षा श्रेष्ठ काहीच नव्हतं. त्यांच्या बद्दल असं म्हटलं जात असे की ‘If at all there was any sweetheart in his life, that was his motherland’ सावरकरांची इंग्रजी कवितेची जाण देखील उच्च दर्जाची होती. त्यांनी लिहिलेली ‘The Revolutionist to Himself’ ही कविता त्यांचावरील असलेल्या ज्येष्ठ इंग्रजी कवी जॉन मिल्टन चा प्रभाव दाखवते. इंग्रजी, संस्कृत, मराठी सोबतच त्यांचे उर्दू भाषेवर देखील प्रभुत्व होते. हिंदुत्वाची व्याख्या करणारा व संस्कृत प्रचुर मराठी वापरणारा सावरकरांसारखा एक तत्वज्ञ जेंव्हा उर्दू भाषेचा साज आपल्या काव्याप्रतीभेस चढवतो तेंव्हा त्यांच्या तरल भावाविश्वाचे दर्शन होते. २०१३ साली अभ्यासकांना सावरकरानी लिहिलेल्या काही उर्दू गझल सापडल्या. त्यातील काही शेर असे: यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयाँ मेरा मैं बंदा हिंदवाला हूँ, यही हिंदोस्ताँ मेरा मेरा है रक्त हिंदी, जात हिंदी, ठेठ हिंदी हूँ यही मजहब, यह फिर्का, यही हैं खानदाँ मेरा विशेष म्हणजे १९३८ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना सावरकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाषाशुद्धी, लिपिशुद्धी ह्यांचे महत्व सांगितले. साहित्याचे वस्तुनिष्ठ व रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्याचे विवरण करत भाषणाच्या अखेरीस लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ असा परखड विचार मांडला. देशसेवेचे वृत्त हे सतीचे वाण म्हणून स्वीकारलेला हा कवी ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ असा उद्घोष करतो. आजच्या जगात देखील साहित्यिक व कवींच्या समोर असलेल्या आव्हानांना मोठी दिशा देणारी स्वातंत्र्यवीरांची लेखणी व काव्यसंपदा आपल्याला दीपस्तंभासारखी भारताच्या उर्जस्वल भविष्याची साक्ष देत राहते.



 *** डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी


 28 मे रोजी खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात महाराष्ट्रातील तरुणाईला संबोधित करता आला याचा अभिमान वाटतो 
:::::::

 *स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त #FacebookLive* @ABVPKonkan 
 विषय:- *"स्वातंत्र्यवीर सावरकर: एक बहु आयामी कवी"

 वक्ता:- *डॉ. प्रशांत धर्माधिकारी*
(सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे)

 *२८ मे २०२० | सायं. ६:०० वा*

करोनोत्तर उच्च शिक्षणातील नवे प्रवाह

करोनोत्तर उच्च शिक्षणातील नवे प्रवाह डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी करोना लॉक डाऊन च्या काळात शिक्षण हे अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत नाही हे वास्तव समोर आले. हे खूप दुर्दैवी आहे. " वर्क फ्रॉम होम "ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात अजून म्हणावी तेवढी रुजली नाही. हे होण्याचे कारण म्हणजे भारतात अध्ययन अध्यापनाचा परंपरागत दृष्टिकोन. शिक्षकांनी निर्धारित विषय व अभ्यासक्रम परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवावा ही अपेक्षा विद्यार्थी व एकूणच व्यवस्थेची असते. त्यामुळे वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम, काही सुविद्य अपवाद वगळता , रटाळ पद्धतीने 'संपवला' जातो. असं दिसतं की विद्यार्थ्यांना परीक्षेचा कंटाळा आला आहे. परीक्षा घेण्याच्या पद्धतीचा किंवा एकूणच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या रटाळ प्रश्नांचा उबग आला असावा असे वाटते. मात्र लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी घरीच बसून इतके वेगवेगळे उपक्रम करत आहेत. शिक्षकांना सुद्धा झूम, गुगल मीट, व्हिडीओ कॉल या माध्यमातून लेक्चर घेताना वेगळाच फील येतोय. उच्च शिक्षणातल्या रेट्यामुळे का होईना वेबिनार, एफ डी पी चे सेशन्स प्राध्यापक करत आहेत. करोनोत्तर जगात डिजिटल कौशल्य अद्ययावत असण्याची अपरिहार्यता यामागे आहे. आपण स्पर्धेत मागे पडू ही भीती आहे. लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधताना त्यांच्यासोबत झालेल्या चर्चांमधून व माझ्या वयक्तिक परदेशी विद्यापीठांच्या अभ्यासदौऱ्यातील अनुभवांवरून करोनोत्तर उच्चशिक्षण कसे असेल यावर काही मुद्दे खालीलप्रमाणे मांडता येतील. 1.करोनोत्तर अभ्यासक्रम तयार करताना त्याची उद्देशिका (Mission Statement) ही संपूर्ण पणे वेगळी असेल. शिक्षण थेरोटीकल शिकवण्यापेक्षा डिजिटल मॉड्युल्स तयार करून व ई- रिसोर्स देऊन बनवावे लागतील. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक असल्याने भाषेचे उदाहरण देईन. इंग्रजी संभाषण क्षमता आत्मसात करण्यासाठी सद्य प्रचलित अभ्यासक्रमात थेरोटीकल गोंष्टींचा भरणा जास्त आहे मात्र भाषा अवगत करण्यासाठी त्या भाषेतील गोष्टींचे श्रवण Listening skills कडे दुर्लक्ष होते. या उलट रोज 20 मिनिटे इंग्रजीतील टेड स्पिचेस वर्गात मोठ्या आवाजात ऐकवली तर विद्यार्थी एका महिन्याच्या आत इंग्रजी बोलतात. आपण भाषेबद्दल शिकवतो भाषा शिकवत नाही. व्याकरणशिकवण्यापेक्षा त्या भाषेतील उच्चदर्जाचे साहित्य शिकवण्याच्या अनुभवातून भाषा शिकता येते. 2. करोना लोकडाऊन मध्ये सर्व क्षेत्र ठप्प आहेत मात्र डिजिटल व आय टी क्षेत्र हे मोठ्या (ऐटीत) तेजीत होती. आजसुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर एडीएक्स, कोर्सेरा इत्यादी संकेतस्थळांनी करोना लॉक डाऊन स्पेशल कोर्सेस अत्यल्प पैशात सुरू केले आहेत. अभियांत्रिकी, विधी, विज्ञान, साहित्य, भाषा आशा अनंत विषयावर कमीत कमी 1 दिवस ते 4 आठवडे या कालावधीत संपणारे अभिनव अभ्यासक्रम एमआयटी व हार्वर्ड या अमेरिकेतील लब्धप्रतिष्ठित विद्यापीठांनी Edx.org या प्लॅटफॉर्म वर सुरू केले आहेत. कुठल्याही अभ्यासक्रमाला कमीत कमी 1हजार ते 30 हजार विद्यार्थी नाव नोंदवतात. त्यातही दोन प्रकार आहेत. तुम्ही तो कोर्स विनामूल्य पूर्ण करू शकता किंवा अगदी50 ते 100 डॉलर मध्ये कोर्सचे त्या विद्यापीठाचे सर्टिफिकेट मिळवू शिकता. उदाहरणार्थ मी edx.org या प्लॅटफॉर्म वर William Shakespeare: Life and Works हा हार्वर्ड विद्यापीठाचा 4 आठवड्याचा कोर्स करत आहे. या कोर्सला नाव नोंदवणारा मी 20,345 वा विद्यार्थी आहे. मला सर्टिफिकेट साठी फक्त 49 डॉलर अर्थात 3780 रुपये भरावे लागले. मात्र मला हार्वर्डचे सर्टिफिकेट मिळणार व तेही भारतात बसून. सोबत वरील विषय शिकवणारा स्टीफन ग्रीनब्लाट हा अमेरिकेतील शेक्सपिअर या विषयावरचा ख्यातकीर्त अभ्यासक आहे . 3. परीक्षा पद्धतीत सकारात्मक बदल करावे लागतील. उदाहरणार्थ edx.org या प्लॅटफॉर्मवर परीक्षा ही अभिनव पद्धतीने घेण्यात येते. ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करून अभ्यासक्रमाला नाव नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन चर्चा एकत्रपणे करता येते. कल्पक प्रकल्प ( असाईनमेंट) देऊन त्याचे मूल्यमापन प्रथम आपले सहाध्यायी करतात (Peer evaluation). या डॅशबोर्डवर शिक्षक वेळप्रसंगी आशयाचे नियमन करतो व ग्रेडिंग करतो. शिक्षकाने दिलेल्या व्हडिओ लेक्चर वर आधारित 300 वा500 शब्दात उत्तर लिहिण्यासाठी असाईनमेंट दिली जाते . कोर्स समाधानकारक रित्या पार पडल्यास प्रमाणपत्र मिळते. सध्या भारतात लॉकडाऊनच्या काळात वेबिनारचे पीक आले आहे. एरव्ही जे वर्गावर जाऊन बोलणार असतो ते आपल्या गॅलरीत बसून बोलणे म्हणजे वेबिनार नाही. अध्यापनाचा आशय डिजिटली बदलत नाही तोपर्यंत ते व्याख्यान रोचक होत नाही 4. करोनोत्तर काळात परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा कमी होईल असे वाटते. किंवा असे अभ्यासक्रम अधिक प्रमाणात सुरू करावयास हवे की ज्यामध्ये काही वर्ष भारतातच डिजिटल माध्यमातून परदेशातील अभ्यासक्रम करता येईल व केवळ शेवटचे संपूर्ण सेमिस्टर विद्यार्थी परदेशात जातील व भारतात परत येऊन स्टार्टप सूरु करतील. असं झाल्यास उच्च शिक्षित मनुष्यबळास भारतात परत आकर्षित करण्यात येईल. ब्रेनड्रेन थांबेल. 5. हुशार मुलांना भारतातच सामावून घेण्यासाठी आपल्याला शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणावी लागेल. केवळ फेसबुक, इन्स्टाग्राम, व व्हॉट्सप वापरता आलं म्हणजे डिजिटल होता आलं असंनाही. शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन, अभिनव अभ्यासक्रम निर्मिती, कार्यानुभवाधारीत शिक्षण, केवळ प्रमाणपत्र वा गुणपत्रिका न देता ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करणारे शिक्षण निर्माण करावे लागेल. चित्रपटाचे ट्रेलर पाहून जसा आपण चित्रपट पाहतो तसेच एखाद्या अभ्यासक्रमाचे ब्रँडिंग हे त्यातून अवगत होणाऱ्या कौशल्यावर आधारित असावे लागेल. हार्वर्ड च्या व ऑक्सफर्डच्या धर्तीवर आपल्यालाही चांगले कोर्स निर्माण करावे लागतील. अध्यापनाचा आशय व तो आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची पद्धत अमुलाग्र बदलेल. 6 प्रादेशिक भाषांमध्ये आशय निर्मितीची प्रचंड गरज जाणवेल. उदाहरणार्थ भारतीय भाषा शिकवण्यासाठी युट्युबवर असंख्य चॅनेल आहेत. अनेक गोष्टी प्रादेशिक भाषेत उपलब्ध करून देण्याची गरज डिजिटल क्रांतीने निर्माण केली आहे. मराठी, हिंदी तसेच अन्य प्रादेशिक या भाषांमध्ये डिजिटल व्यवहारकरणाऱ्यांची संख्या लक्षणीयअसून त्यांच्यासाठी प्रादेशिक भाषेत आशयनिर्मिती करावी लागेल. 7. शिक्षणातील डिजिटल क्रांतीसाठीशिक्षकव प्राध्यापकांना प्रशिक्षित करावे लागेल.जे स्वतःला अद्ययावत ठेवतील, शिक्षणातील नवे प्रवाह समजून घेतील तेच स्पर्धेत टिकतील. हे विधान दर वेळी केले जाते मात्र करोनोत्तर काळात प्रकर्षाने जाणवेल. कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Intelligence) व मशीन लर्निंग हे सध्या परवलीचे शब्द आहेत. याचा अध्यापनात वापर करावा लागेल. 8. शिक्षक व प्राध्यापक यांची निवड करताना पात्रतेचे निकष बदलतील. संबंधित विषयाचे ज्ञान व अध्यापन कौशल्य यासोबत ती व्यक्ती आधुनिक तंत्रज्ञानाशी (टेक्नॉसॅव्ही) असावी असा निकष ठरेल. म्हणजे वर्गावर जाऊन शिकवण्यापेक्षा डिजिटल टूल्स वापरून लेक्चर घेण्यासोबत त्याला आशय निर्मिती कल्पकतेने करता यायला हवी. डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे युवल नोवा हरारी या प्रख्यात लेखकाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या Twenty Lessons for 21st Century या पुस्तकात तो म्हणतो "to stay relevant, you will need the ability to ‘constantly learn and to reinvent yourself" करोनोत्तर काळात शिक्षण क्षेत्राला अमुलाग्र बदल घडवून कात टाकण्याची गरज प्रकर्षानेजाणवू लागली आहे. भारत या क्षेत्रातजे बदल घडवून आणेल ते बदल पुढचे सहस्रक घडवतील

मंगलवार, 28 अप्रैल 2020

२३ एप्रिल: शेक्सपिअर च्या ४०४ व्या जन्मदिनानिमित्त

२३ एप्रिल: शेक्सपिअर च्या ४०४ व्या जन्मदिनानिमित्त २३ एप्रिल जसा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो तसाच प्रख्यात इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपिअर चा जन्मदिन म्हणून देखील जगभर साजरा केला जातो. २३ एप्रिल १६१६ ते २३ एप्रिल २०२० हा ४०४ वर्षाचा काळ विल्यम शेक्सपियर जगभरातील साहित्यिकांचा एक अभ्यासाचा विषय म्हणून चर्चिला जातो.त्याच्या नाटकांची मोहिनी आजही भारतीय मनावर आहे. बॉलीवूड च्या ‘मकबूल, ओंकारा, हैदर, रामलीला इत्यादी चित्रपटांची कथावस्तू शेक्सपियरच्या नाटकावर आधारित असून मराठीतील प्रसिद्ध “ नटसम्राट” हा चित्रपट शेक्सपिअर च्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. त्याच्या सर्व नाटकांची जवळजवळ सर्व भारतीय भाषांत भाषांतर झालेली आहेत. विशेषकरून मराठी रंगभूमीवर त्याच्या नाटकांचे अनेक प्रयोग सादर झाले. थोडक्यात शेक्सपियर हा भारतीय जनमानसात बेमालूम मिसळला आहे. ज्येष्ठ इंग्रजी कवी एझ्रा पाउंड यांनी साहित्याची व्याख्या करताना असं म्हटलं कि “Literature is a news which stays news”अर्थात साहित्य म्हणजे नेहमी ताजं राहणारं. अनेक दिवस लोटले तरी साहित्य अजरामर राहत. प्रख्यात इंग्रजी कवी जोन कीट्स म्हणतो A thing of beauty is a joy for ever: Its loveliness increases; it will never pass into nothingness; अर्थात जे नित्य नूतन भासते व कधीही जुने होत नाही त्याला सौन्दर्य असे म्हणतात. असाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये “ जे नित्य नूतन जाणिजे/ गीतातत्व // असं म्हटले आहे. कितीदा हि वाचले तरी परत पुन्हा वाचावे वाटणे ही चांगल्या साहित्याची खरी ओळख. शेक्सपिअर च्या साहित्याचे असेच आहे. ब्रिटीश कौन्सिलच्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले की भारतात शेक्सपियर इंग्लंडच्या तुलनेत जास्त अभ्यासला जातो. त्याची कारणे अनेक दिली जातात. भारतीय विद्यापीठाच्या कुठल्यातरी वर्षात शेक्सपियर शिकणे अनिवार्य असल्यामुळे कदाचित, किंवा इग्रजांच्या वसाहतीकरण (Colonization) च्या मानसिकतेचे छुपे समर्थन शेक्सपियर करतो म्हणून असेल, मात्र त्याच्या लेखनाची बलस्थाने या निमित्ताने अभ्यासली पाहिजेत. मागच्या वर्षी शेक्सपियरच्या जन्मगावी : Stratford Upon Avon येथे त्याच्या जन्मघरी ज्येष्ठ अभ्यासक डॉ विजय बेडेकर यांच्या सोबत जाण्याचा योग विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लंड अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने आला होता. या जन्मगावी शेक्सपिअरचे यथोचित स्मारक करण्यात आले आहे. आजही त्याचे पैतृक घर "शेक्सपियर बर्थप्लेस ट्रस्ट " नावाने मोठ्या दिमाखात उभे आहे. तो येथील हेन्ले रस्त्यावरील एका घरात जन्मला. १८४७ साली हे घर शेक्सपिअर-विश्वस्तांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यू प्लेस या शेक्सपिअरच्या घराचा मात्र फक्त चौथरा शिल्लक आहे. शेजारच्या वस्तुसंग्रहालयात शेक्सपिअरशी संबंधित वस्तू ठेवल्या आहेत. स्ट्रॅटफर्डच्या चर्चमध्ये त्याचे थडगे व अर्धाकृती पुतळा आहे. ॲव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. ग्रंथालयात शेक्सपिअरवरील दहा हजारांवर दुर्मिळ पुस्तके व हस्तलिखिते आहेत.जगभरातून साधारणत: ६ लाख पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. आजही तेथे त्याच्या अनेक नाटकांचे प्रयोग नियमित होतात. शेक्सपिअर च्या जन्मस्थळाला मी भेट दिल्यावर तयार केलेला एक सुंदर व्हिडीओ ची लिंक सोबत देत आहे. जिज्ञासूनी आवर्जून पहावी ( https://www.youtube.com/watch?v=dq8pNyQh7mc&t=81s) करोना लॉक डाऊन च्या काळात ग्लोब थियेटर ने तेथील सादर होणाऱ्या नाटकांचे थेट प्रक्षेपण युट्युब वरून जगभरातील शेक्सपिअरप्रेमीसाठी विनामूल्य होत आहे. नुकताच त्याचा रोमियो व ज्युलियट या नाटकाचे लंडन येथील प्रसिद्ध ग्लोब थियेटर मधून थेट प्रक्षेपण झाले. जिज्ञासू वाचकांसाठी ती लिंक सोबत देत आहे. (https://www.youtube.com/watch?v=eSAlPJ0FG_0) शेक्सपिअरच्या नाटकांची एकत्र संपादित आवृत्ती (फर्स्ट फोलिओ) जॉन हेमिंग व हेन्री काँडेल यांनी १६२३ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांतील छत्तीसपैकी अठरा नाटके प्रथमच छापली गेली. इतर अठरा अगोदर वेगवेगळी (क्वार्टो आवृत्त्या) छापून प्रसिद्ध झाली होती व त्यांची कायदेशीर नोंदही झाली होती. फर्स्ट फोलिओत पेरिक्लीझ हे नाटक नाही. काही नाटकांच्या फोलिओ व क्वार्टो आवृत्त्यांतील संहितेत कमालीचा फरक दिसतो. काही क्वार्टो आवृत्त्यांतील संहिता तर भ्रष्ट स्वरूपात आहेत. ही नाटके कुणीतरी नाट्यप्रयोग पाहताना किंवा नंतर स्मरणातून लिहून काढली, असा तर्क आहे. या आवृत्त्या विनापरवाना छापल्या असाव्यात, असेही म्हणतात. असे प्रकार त्या काळी सरसहा चालत. शेक्सपिअरवर इतक्या विविध दृष्टिकोनांतून लिहिले गेले आहे की, त्यामुळे समीक्षेच्या कक्षाच विस्तारल्या आहेत. प्रत्येक शतकाने आपापल्या अभिरुचीप्रमाणे शेक्सपिअरचा अभ्यास केला आहे. त्याच्यातील कलात्मकतेच्या व प्रतिभेवरील हुकमतीच्या अभावाचे दिग्दर्शन करूनही त्याचा समकालीन बेन जॉन्सन त्याला अभिजात ग्रीक नाटककारांच्या पंक्तीत बसवतो. जॉन मिल्टन व जॉन ड्रायनने (सतरावे शतक) त्याच्या निसर्गदत्त प्रतिभेचा गौरव केला व या प्रतिभेच्या दीप्तीने आपल्या ठायी असलेल्या व्युत्पन्न विद्वत्तेच्या अभावाची जाणीव त्यास होऊन दिली नाही, असे म्हटले. शेक्सपिअरच्या शिक्षणाचा ऊहापोह करणारी पुस्तकेही प्रसिद्ध झाली. अठराव्या शतकात शेक्सपिअर व त्याचे समकालीन यांच्याविषयी माहिती गोळा करण्यात आली. शेक्सपिअरच्या नाटकांतील उणिवा व दोषस्थळांची यादी करण्यात आली. शेक्सपिअरखंडाच्या आपल्या विद्वत्तापूर्ण व विवेचक प्रस्तावनेत डॉ. जॉन्सन शेक्सपिअरबद्दल गौरवोद्गगार काढतो पण त्याच्याविषयी न्यायाधीशाचीच भूमिका घेतो. शेक्सपिअरने योजिलेल्या प्रतिमांच्या आधारे त्याच्या सर्जनशील प्रतिभेचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न अठराव्या शतकापासून आजतागायत चालू आहे. शेक्सपिअरच्या नाटकांतील व्यक्तिरेखांचा अभ्यास अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच सुरू झाला. शेक्सपिअरच्या पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण अत्यंत एकसंध रीतीने होते. त्याच्या नाटकातले व्यक्तिचित्रण म्हणजे सतत विकसित होत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ अल्पसे दर्शन वाटावे इतकी त्या व्यक्तिचित्रात सूचकता असते. शेक्सपियर वर अनेक अभ्यासकांनी अत्यंत सुंदर समीक्षा केली आहे. हा एका अजून वेगळ्या लेखाचा विषय होईल. मात्र इंग्रजीची पहिली डिक्शनरी तयार करणारा म्हणून प्रसिद्ध असलेला प्रख्यात समीक्षक डॉ सम्युअल जॉन्सन आपल्या “ प्रीफेस टू शेक्सपियर” या महत्वपूर्ण निबंधात म्हणतो कि, “Shakespeare is above all writers, at least above all modern writers, the poet of nature; the poet that holds up to his readers a faithful mirrour of manners and of life. His characters are not modified by the customs of particular places, unpractised by the rest of the world; by the peculiarities of studies or professions, which can operate but upon small numbers; or by the accidents of transient fashions or temporary opinions: they are the genuine progeny of common humanity, such as the world will always supply, and observation will always find. His persons act and speak by the influence of those general passions and principles by which all minds are agitated, and the whole system of life is continued in motion. In the writings of other poets a character is too often an individual; in those of Shakespeare it is commonly a species.” वरील डॉ जोन्सन याच्या उद्धरणाचा साकल्याने आभ्यास केला असतो असे दिसते कि, शेक्सपिअर ला मानवी मनाची उकल झाली होती. त्याची पात्र जरी इंग्लिश मध्ये बोलणारी व पाश्च्यात्य धाटणीची असली तरी मानवी भावना अस्सल होत्या. शेक्सपिअर ने तत्कालिनी उपलब्ध असलेले नाट्य अभिनयाचे कुठलेही विद्यापीठीय शिक्षण न घेता तत्कालीन ब्रिटीश रसिक मनांवर अधिराज्य गाजवले ते अतुलनीय आहे. शेक्सपिअर च्या समकालीन नाटककारांत प्रसिद्ध असलेले क्रिस्तोफर मारलो इत्यादी ‘युनिव्हर्सिटी विटस” नी शेक्सपिअर ची टीका केली आहे. त्यांचे म्हणणे असे होते कि, शेक्सपिअर ने नाटकाचे कुठलेही अधिकृत शिक्षण न घेता त्याची नाटकं इतकी प्रसिध्द का होतात. रोबर्ट ग्रीन या शेक्सपिअर च्या समकालीन लेखकाने तर त्यावर "an upstart Crow, beautified with our feathers", अशी टीका केली. इंग्लंडमध्ये नाट्यगृहे १५९२ ते १५९४ पर्यंत प्लेगमुळे बंद होती. या काळात शेक्सपिअरने व्हीनस अँड अडोनिस व द रेप ऑफ ल्यूक्रीझ ही नितांत सुंदर काव्ये लिहिली. तो इटली, डेन्मार्क व जर्मनीलाही जाऊन आला असा तर्क आहे. १५९४ मध्ये नाट्यगृहे परत सुरू झाली. या वर्षापासून शेक्सपिअरचे नाव सतत अग्रभागी दिसते. तो लॉर्ड चेंबरलिन्स मेन या नाटकमंडळीत होता. ह्याच मंडळीचे पुढे ‘किंग्ज मेन’ असे नाव पडले. या मंडळीसाठी शेक्सपिअरने १५९४ ते १६०३ या काळात दरवर्षाला दोन याप्रमाणे नाटके लिहिली. या नाटकांचे प्रयोग लंडनमधील निरनिराळ्या नाट्यगृहांत झाले. मराठी विश्वकोशाच्या नोंदीनुसार विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांचे चार प्रकार आहेत : ऐतिहासिक, सुखात्मिका, शोकात्मिका व सुखदुःखांचे मिश्रण असणारे रोमान्सेस. सुरुवातीस शेक्सपिअरने हे बहुतेक प्रकार कसे काय जमतात, हेच जणू पाहिल्यासारखे वाटते. हेन्री द सिक्स्थ- ३ भाग (१५९०–९२) हे ऐतिहासिक नाटक. टायटस अँड्रॉनिकस (१५९३) हा खून व भीषण रक्तपाताने रंजित असा त्यावेळचा लोकप्रिय नाट्यप्रकार. द कॉमेडी ऑफ एरर्स (१५९०) हे प्लॉटस ह्या विख्यात रोमन सुखात्मिकाकाराच्या मेनीकमी ह्या सुखात्मिकेचे इंग्रजी रूपांतर. रिचर्ड द थर्ड (१५९२-९३) ही दारुण शोकात्मिका. द टेमिंग ऑफ द श्रू (१५९४) हा अदभुतरम्य फार्स किंवा प्रहसन. या सर्व नाट्यप्रकारांच्या हाताळणीत शेक्सपिअरचे खास वेगळेपण व कौशल्य जाणवते व त्याने रॉबर्ट ग्रीन ह्या ज्येष्ठ नाटककाराचा मत्सर का जागृत केला हेही समजते. आपल्या सर्व नाटकांची सामग्री शेक्सपिअरने लोकांना अगोदरच माहीत असलेल्या साहित्यातून निवडली आणि या परिचित कथावस्तूंना आपल्या दिव्य प्रतिभेने अभिनव सर्जनशील रूप प्राप्त करून दिले. ऐतिहासिक नाटकांत शेक्सपिअरने इंग्लंडचा इतिहास उभा करून लँकेस्टर व यॉर्क घराण्यांची भांडणे व त्यांच्यातील यादवी युद्ध यांचे दुष्परिणाम सूचित केले. तसेच राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व व आदर्श राजाची प्रतिमा ह्यांचे कलात्मक दर्शन घडविले. त्याच्या ऐतिहासिक नाटकांत इंग्लंडचे बहुतेक ट्यूडर राजे आलेले आहेत. उदा., चौथा, पाचवा, सहावा हेन्री दुसरा, तिसरा रिचर्ड जॉन राजा, तिसरा रिचर्ड, पाचवा हेन्री ही त्यांची काही अमर व्यक्तिचित्रे. त्यांतून शेक्सपिअरचे मानवी मनाचे सखोल व सूक्ष्म ज्ञान व निरीक्षण प्रत्ययास येते. पश्चिमी प्रबोधनकाळात जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना नव्यानेच सर्व युरोपीय देशांत निर्माण झाली. शेक्सपिअरने इंग्लंडच्या राष्ट्रप्रेमाचा आपल्या नाटकांतून परिपोष केला. द टू जंटलमेन ऑफ व्हेरोना (१५९४), लव्ह्‌ज लेबर्स लॉस्ट (१५९४), मिडसमर नाइट्स ड्रीम (१५९६), द मर्चंट ऑफ व्हेनिस (१५९६), मच अडू अबाउट नथिंग (१५९८), ॲज यू लाइक इट (१५९९), ट्‌वेल्फ्थ नाइट (१५९९) या सुखात्मिकांतून शेक्सपिअरच्या असामान्य प्रतिभेने नाट्यकलेचे सर्व पैलू उजळून काढले. त्यांत मानवी जीवनाचे चौफेर, सूक्ष्म व सावध निरीक्षण आहे. खोचक, बोचक तसेच खळाळून हसविणाऱ्या अव्वल दर्जाच्या विनोदाची कारंजी त्यांत आहेत. असंख्य संस्मरणीय व्यक्तिरेखा आहेत. उदा., शायलॉक, माल्व्होलिओ इत्यादी. रमणीय, बुद्धिमान व जीवनाकडे टवटवीत मनाने पाहणाऱ्या नायिकांचे या सुखात्मिकांत वर्चस्व दिसते. त्यात स्वर्गीय प्रेमभावनेची तरफदारी व कृत्रिम भावनाविवशतेची गोड थट्टाही आहे. डॉगबेरी, व्हर्जेस, विदूषक अशी अनेक विनोदी पात्रे अतिसहजपणे कथावस्तूचा अविभाज्य भाग म्हणून निर्माण करण्यात आली आहेत. ह्या सुखात्मिकांची संविधानके अनेक गोष्टी, कथा, हकीकती वगैरेंच्या बेमालूम मिश्रणातून तयार झाली आहेत. त्यांतील रचनाकौशल्याने मन स्तिमित होते. घटनांचा क्रम व संगती प्रत्यक्ष जीवनात असावी, इतक्या सहजपणे साधण्यात आली आहे आणि नाटकांच्या संदर्भातही त्यांना तितकीच सहज अपरिहार्यता प्राप्त करून दिली आहे. अव्वल दर्जाचे काव्य, समृद्ध भाषा, नवे शब्द व वाक्प्रचार, गेय गीते यांची या सुखात्मिकांत लयलूट आहे. जीवनाचा भाष्यकार शेक्सपिअर या सुखात्मिकांच्या कालखंडात जीवनाकडे प्रसन्न, आशावादी व ध्येयदृष्टीने पाहत आहे, हे जाणवते. रिचर्ड द थर्ड व रोमिओ अँड ज्यूलिएट (१५९७) ह्या नाटकांपासून शेक्सपिअरने शोकात्म नाटके लिहिण्यास सुरुवात केली. इ. स. १५९९ ते १६०६ या काळात त्याने जगप्रसिद्ध शोकात्मिका लिहिल्या. उदा., ज्यूलिअस सीझर (१५९९), हॅम्लेट (१६००), ऑथेल्लो (१६०३), किंग लीअर (१६०५), मॅकबेथ (१६०६), अँटनी अँड क्लीओपात्रा (१६०७), टायमन ऑफ अथेन्स (१६०५–०८). यांचा अभ्यास गेली तीनशे वर्षे सतत चालू आहे. यांतील प्रत्येक शोकात्मिका वेगवेगळ्या कारणांसाठी श्रेष्ठ आहे. प्रत्येकीने मानवी जीवनातील गूढ गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व शोकात्मिका एकाच कालखंडात व सुखात्मिकांचा नजराणा प्रेक्षकांना दिल्यानंतर लिहिल्या गेल्या, ही गोष्ट अभ्यासकांना फार अर्थपूर्ण वाटते. या शोकात्मिकांतून खुद्द शेक्सपिअरच्या भावनिक व मानसिक संघर्षाचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न नित्य चालू आहे. मानवी जीवनातील दुःखे नेमकी कशामुळे निर्माण होतात ? ग्रीक दृष्टिकोनाप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला दुःखच येणे, ही त्या व्यक्तीची नियती असते. तसेच केवळ योगायोगाने जीवनात दारुण घटना घडतात, हेही दिसून येते. पण व्यक्ती हीच आपल्या विशिष्ट स्वभावामुळे स्वतःच्या दुःखांना कितपत जबाबदार धरता येईल, असा गहन प्रश्न शेक्सपिअरने उपस्थित केला. स्वभावातील एखादी उणीव हीच व्यक्तीच्या दारुण शोकात्म जीवनास कारणीभूत होते, हे हॅम्लेट, लीअर, ऑथेल्लो इत्यादींच्या चित्रणातून शेक्सपिअरने दाखवून दिले. फारसा अभिनिवेश न बाळगता व्यक्तीच्या दुःखमय जीवनास थोडी नियती, थोडा योगायोग, थोडाफार त्या व्यक्तीचा विशिष्ट स्वभाव इ. कारणीभूत होतात, असे तो सुचवितो. या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्यक्ष संघर्षापेक्षाही व्यापक स्वरूपाचा तिचा अंतःसंघर्ष चालू असतो वा तो शिव व अशिव यांतील संघर्ष असतो. या संघर्षांतून शेवटी चांगलेच निर्माण होते परंतु ते चांगल्या गोष्टींच्या विनाशाची जबर किंमत देऊनच, असेही शेक्सपिअरने सूचित केले आहे. पण एकंदरीने जीवन हे एक अनाकलनीय गूढ आहे, हेच जाणवत राहते. अँड्रू सिसिल ब्रॅडलीने या दृष्टिकोनातून शेक्सपिअरच्या शोकात्मिकांचा तपशीलवार अभ्यास केला. प्रमाद, दुःख आणि पाप यांचे कडू जहर या शोकात्मिकांना झाकोळून टाकते. त्यांतील दैवाचा खेळ क्रूर आहे. उदा., ऑफेलिया, डेस्डेमोना, कॉर्डेलिया यांसारख्या निष्पाप नायिकांचा बळी. मानवी जीवन म्हणजे केवळ क्रौर्य व राक्षसीपणा त्यात सद्-गुणांचा विजय व दुर्गुणांचा पराजय वगैरे काही नाही, असे या शोकात्मिकांतून सुचविले आहे. या भीषण जीवनदर्शनाची छाया या काळातल्या ट्रॉइलस अँड क्रेसिडा (१६०२), ऑल्स वेल डेटा एंड्स वेल (१६०२), मेझर फॉर मेझर (१६०४) या सुखशोकमिश्रित नाटकांवरही (रोमान्सेस) पडली आहे. जगविख्यात व्यक्तिचित्रे (हॅम्लेट, इआगो, लीअर) सखोल तत्त्वज्ञान (हॅम्लेटची स्वगते, लीअर व त्याच्या विदूषकाची जीवनावरील भाष्ये) दर्जेदार काव्य मानवी जीवनातल्या सर्व रहस्यांचे अमोघ भाषेत अनावरण परिचित कथासामग्रीवरील दिव्य प्रतिभेचे संस्करण ही शेक्सपिअरच्या शोकात्मिकेची वैशिष्ट्ये होत. शेक्सपिअरच्या शेवटच्या कालखंडातील नाटके म्हणजे पेरिक्लीझ (१६०८), सिंबेलाइन (१६०९), द विंटर्स टेल (१६१०) व टेंपेस्ट (१६११). या काळात शेक्सपिअर स्ट्रॅटफर्डला स्थायिक झाला होता. त्याला भरपूर लोकप्रियता, कौटुंबिक स्वास्थ्य व ऐश्वर्य मिळाले होते. त्याचा प्रभाव या नाटकांवर पडला आहे असे मत मांडले गेले आहे. ह्या नाटकांची रचना काहीशी सैल आहे. त्यांत जादू, चमत्कार, असंभाव्य घटना, सुख-दुःखांचे मिश्रण, संगीतिकेतील दृश्यकाव्य व संगीत यांचे एक विलक्षण रसायन झालेले दिसते. शेक्सपिअरच्या वृत्तीतील स्थिरता त्यांतून प्रत्ययाला येते. झाले गेले विसरून उदार अंतःकरणाने क्षमाशील बनणे, हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ गुणविशेष आहे, हेही त्यांतून सूचित झाले आहे. मात्र तरीही शेक्सपिअरला जी प्रसिद्धी व मान मरातब मिळाला तो त्याचा समकालीन कोणाही नाटककाराला मिळाला नाही हे तितकेच खरे. याचे कारण होते ते म्हणजे शेक्सपिअर ला श्रोत्यांना नेमके काय हवे आहे ते देण्याची कला व जाण. शेक्सपिअर च्या सर्व शोकांतिका मध्ये शेवटी सर्व पात्रे एकमेकांना मारून टाकतात. रंगमंचावर खूप रक्तपात होतो. प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल याने आपल्या “पोएटीक्स” या ग्रंथात स्पष्ट म्हटले आहे कि, रंगमंचावर रक्तपात दाखवू नये. तरीही शेक्सपिअर रक्तपात दाखवतो याचे कारण तत्कालीन ब्रिटीश मानसिकते होते. तत्कालीन म्हणजे १६ व्या शतकातील इंग्रजी समाज हा अशिक्षित होता, व रक्तपिपासू वृत्तीचा होता. रंगमंचावर रक्त सांडलेले पाहून त्यांना बदल्याची भावना जागृत होता असे, व दुष्टाला शिक्षा झाली या अविर्भावात त्यांना हलके वाटत होते. शेक्सपिअर ने या तत्कालीन प्रेक्षकांच्या मनाचा विचार करून आपल्या शोकान्तिक लिहिल्या. म्हणजे शेक्सपिअर ज्या १६ व्या शतकात क्रूर व अनागर ब्रिटिश प्रेक्षकांसाठी लिहित होता, त्या काळात “विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले” असा उद्घोष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी करत ज्ञानेश्वरी नावाचा अजोड ग्रंथ लिहून ४०० वर्षे झाली होती. संत एकनाथांचे अवतार कार्य व ग्रंथलेखन कार्य पार पडले होते. संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत सांस्कृतिक योगदान देत होते. याच काळात इंग्लंडमध्ये शेक्सपिअर नाटकं लिहित होता. मराठीचे ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी शेक्सपिअर व तुकाराम महाराज यांच्या सामाकालीनत्वाचा उल्लेख करत एक सुंदर कविता लिहिली. ती आजही तेवढीच रसरशीत वाटते. तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला ।। तो झाला सोहळा। दुकानात. जाहली दोघांची । उराउरी भेट उरातलें थेट । उरामध्ये तुका म्हणे "विल्या। तुझे कर्म थोर; अवघाचि संसार । उभा केला।।" शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले; । तुका जे पाहिले विटेवरी." तुका म्हणे, "बाबा ते त्वां बरे केले, त्याने तडे गेले। संसाराला; विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी । लिहोनिया." शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले । शब्दातीत तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट प्रत्येकाची वाट । वेगळाली वेगळिये वाटे । वेगळिये काटे; काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच. ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी। कजागीण घरी । वाट पाहे." दोघे निघोनिया गेले दोन दिशां कवतिक आकाशा आवरेना । या कवितेत शेक्सपिअर तुकारामांना भेटायला त्यांच्या दुकानात देहूत येतो. त्यांची उराउरी भेट होते व जीवनाबद्दल चर्चा होते. तुकाराम महाराज शेक्सपिअर च्या नाटकांची व त्यातून त्याने उभ्या केलेल्या संसाराचे कौतुक करतात. मात्र शेक्सपिअर तुकोबांना म्हणतो की, तुम्ही हे विटेवर "सावळं परब्रह्म'' पांडुरंगाच्या रूपाने पहिले ते मला जमले नाही. अर्थात दोन जागतिक दर्जाच्या कवींची भेट होऊन त्यांनी आपलं हृदगत एकमेकांना सांगितलं. आपण मूकपणे त्यांच्या प्रतिभेला विंदांच्या दृष्टीने "वेगळिये वाटे । वेगळिये काटे; काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच" असं म्हणत सलाम करावयाचा. डॉ प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी सहाय्यक प्राध्यापक जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे 23.04.2020

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...