सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
सोमवार, 31 जनवरी 2022
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी "लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह प्रस्तावना
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
"लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात:
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे चरित्र म्हणजे विशाल द्रष्टेपणा व अदम्य कर्तेपणा यांचा भव्य संगम होय. लोकमान्य टिळकांचे चरित्र म्हणजे प्रत्यक्षात घडलेले महाकाव्य आहे. हे महाकाव्य साहित्यरुपात प्रकट करणारा प्रतिभासंपन्न चरित्रकार मात्र अजून झाला नाही. परंपरागत अध्यात्मिक भारतीय संस्कृतीच्या कुशित जन्मलेला व आधुनिक संस्कृतीच्या सिंहिणींच्या स्तनातील सकस दूध प्राशन केलेला हा "बाळ" आहे. लोकशाही स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भारतव्यापी अधिष्ठान निर्माण करणारे अग्रणी व लोकशाही शक्तींना गांधीजींच्या पूर्वी जागृत करणारा दिव्य दिनमणी म्हणजे लोकमान्य टिळक होय. विद्यार्थी दशा संपल्यापासून अखेरपर्यंत सतत 45 वर्षे एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व प्रकारे वैचारिक व संसारिक मोह टाळून सतत संग्रामस्थ राहणे हाच टिळकांच्या द्रष्टेपणाचा अस्सल निकष आहे
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन
परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...
-
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी "लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस...
-
भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर...
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
जय श्रीराम
जवाब देंहटाएं