ज्ञानेश्वरीला ७२० वर्षे पूर्ण झाली

सर्वांना सांगण्यास आनंद होतो की,


आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला ७२० वर्षे पूर्ण झाली.

आपणा सर्वाच्या कल्याणासाठी माऊली शांत रसात वर्षली आणि मराठी साहित्य़ाला परिपुष्ट केलं...



आर्ताचेनि ओरसे/गीतार्थग्रथनमिसे /

वर्षला शांतरसे /तो हा ग्रंथु ///



छप्पन मराठी बोलीभाषांचा वापर करून जनसामान्यांपर्यंत वेदांतातली गूढतम तत्वे पोचवली आणि ओवी या मराठी छंदाला नवा प्राण दिला.



म्हणूनी सद्भावाची आंजुळी/मिया ओवियाफ़ुले मोकळी/

अर्पिली आंघ्रियुगुळी /विश्वरूपाच्या/////





बरोबर ७२० वर्षांपूर्वी भाद्रपद वद्य षष्ठीला शके १२१२ साली हा ग्रंथ मूर्त झाला..



सर्वांनीच या गोष्टीचे साहित्यिक,सांस्कृतिक मूल्य जाणून ज्ञानेश्वरीचा आभ्यास करण्याचा संकल्प करु या...

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...