सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
रविवार, 28 जुलाई 2019
No Man's Land Film 2001
विद्यार्थ्यांनी चित्रपटसाक्षर झालं पाहिजे: सुधीर नांदगावकर
27 जुलै रोजी जोशी बेडेकर फिल्म सोसायटीच्या वतीने "नो मॅन्स लँड" या 2001 साली ऑस्कर पारितोषिक प्राप्त झालेल्या चित्रपटाचे सादरीकरण झाले. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्री सुधीर नांदगावकर याची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी फिल्म सोसायटीतर्फे दाखवण्यात येणाऱ्या नवनवीन चित्रपटाचे शास्त्रीय विश्लेषण करून सहृदय प्रेक्षक घडवण्यात योगदान करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्री सुधीर नांदगावकर यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. जोशी बेडेकर कॉलेज फिल्म सोसायटी ही ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मोलाची भर घालणारी सोसायटी असून डॉ विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे अविरत पणे काम करत आहे असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. एकूणच भारतीय चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन होताना व अंतिम फेरीत ऑस्कर मिळताना नेमक्या कुठल्या बाबी लक्षात घेण्यात येतात यासंदर्भात श्री नांदगावकर यांनी भाष्य केले. डेनिस टोनोव्हीक यांनी दिग्दर्शन केलेला 2001 साली ऑस्कर मिळालेला "नो मॅन्स लँड" या चित्रपटाला ऑस्कर का मिळाले याची त्यांनी चिकित्सा केली.
हा चित्रपट बॉसनिय व सरबिया या दोन राष्ट्रांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या सर्बिया व बॉसनीया या राष्ट्रांचे दोन सैनिक एका खंदकात अडकतात व त्यांच्या जीवावर बेतलेल्या या प्रसंगातून युद्धाची चिकित्सा करतात. यु एन च्या शांतिसेनेच्या कार्यप्रणालीवर देखील हा चित्रपट भाष्य करतो. या युद्धाचे वार्तांकन करणारी लिव्हिंगटन नावाची महिला पत्रकार सर्वांचे लक्ष वेधून घेते. एकूणच युद्धाने कुठलेच प्रश्न सुटत नाहीत असा सल्ला हा चित्रपट देऊन जातो.
चित्रपटाचे सादरीकरण झाल्यास विद्यार्थ्यांनी चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. फिल्म सोसायटीचे समन्वयक डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी विल्फ्रेड ओवेन या कवीच्या " स्ट्रेंज मिटिंग" या कवितेचा दाखला देत चित्रपटाच्या युद्धविषयक काही प्रसंगावर भाष्य केले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे, ग्रंथपाल नारायण बारसे , जनसंज्ञापन विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील तसेच बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन पिंगळे यांनी केले.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन
परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...
-
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी "लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस...
-
भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर...
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें