सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
गुरुवार, 25 जुलाई 2019
मानवी कल्याण हाच कलेचा हेतू : पद्मश्री डॉ वामन केंद्रे
दि 19 जुलै,2019 रोजी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे 19 वे पुष्प ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ वामन केंद्रे यांनी
क " जीवन आणि नाटक" या विषयावरील व्याख्यानाने गुंफले. ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशात मोलाची भर घालणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाचे अध्वर्यू राहिलेल्या स्वर्गीय डॉ वा ना बेडेकर यांच्या तपस्वी जीवनाला श्रद्धांजली म्हणून ही व्याख्यानमाला जोशी बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केली आहे. या प्रसंगी डॉ वामन केंद्रे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या
"युवशिल्प" या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे यांच्या "नवनिर्मीतीचे बोन्साय होण्याच्या काळात" या लेखाचा उल्लेख करत एकूणच भारतीय रंगभूमीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. या वेळी युवाशिल्पचे संपादक प्रा संतोष राणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले
ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ वामन केंद्रे आपल्या
"जीवन आणि नाटक" या विषयावरील व्याख्यान देताना म्हणाले की, भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात नाटकाच्या सादरिकरणासोबतच त्याच्या प्रयोजनाबद्दलही स्पष्ट उल्लेख आहेत. रसिकपेक्षकांना मिळणारी सौंदर्यानुभूती हा नाटकाचा खरा परिपाक आहे. ते म्हणाले की 'ज्याच्या जगण्यात नाटक नाही त्यासारखा सपक जीव या धरतीवर नाही'.
डॉ केंद्रे पुढे म्हणाले की, आपलं जगणं एकसुरी होत असून त्या चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडे मानवी संवेदनांना नेणं हेच नाटकाचं काम आहे. साहित्य, संगीत, कला, नाटक याची जाण नसणाऱ्या समाजाचे कितीही आर्थिक उत्थान झाले तरी सर्वांगीण विकास होत नाही. जीवन हे क्षणिक आहे व एकदाच मिळाले आहे या पाश्चात्य वैचारिक धारणेतून समाजाला लागलेली सुख ओरबाडण्याची सवय घातक आहे. यावर उपाय भारतीय परंपरेतच आपणास सापडतो असे ते म्हणाले.
मानवी कल्याण हाच कलेचा हेतू असून समाजात वाढत चाललेले सवंगिकरण हा मोठा चिंतेचा विषय आहे असे ते म्हणाले. स्वतः वर निर्भेळ पणे हसू शकणे हे चांगल्या समाजाचे लक्षण आहे.
महाराष्ट्रात जेवढ नाटकावर प्रेम करण्यात येत तेवढं सहसा कुठेच होत नाही असे डॉ केंद्रे आवर्जून म्हणाले. रोज नवा उत्सव म्हणजे नाटक असं म्हणत आपल्या " झुलवा" 'रणांगण' "मध्यमव्ययोग" "मोहें पिया" आदी नाटकांचा संदर्भ डॉ केंद्रे यांनी आपल्या व्याख्यानात दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी केले तर संयोजन वृत्तविद्या विभागाचे समन्वयक डॉ महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन
परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...
-
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी "लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस...
-
भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर...
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें