सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
रविवार, 2 जून 2019
ठाण्याच्या विद्यार्थ्यांची सावरकर जयंती लंडनमध्ये साजरी
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 28 मे रोजी सावरकरांची 136वी जयंती लंडनमध्ये साजरी केली. विपीएम्स लंडन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च व महाराष्ट्र मंडळ , लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने " सावरकरांची काव्यप्रतिभा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सावरकरांची ओळख समस्त हिंदुस्तानात एक क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीर म्हणून प्रकर्षाने होते, मात्र त्यांच्या कवितेत असलेल्या साहित्यिक अभिरुचिकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. नेमकी हीच कल्पना घेऊन सावरकरांच्या लंडन वास्तवातील कवितांचे विवेचक रसग्रहण करण्याची कल्पना डॉ विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन विभागातील प्रा. डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी मांडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ विजय बेडेकर यांनी सावरकरांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यासाची गरज विशद करताना लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे सावरकरांवरील कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आभार मानले. तसेच महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा श्यामल पितळे यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
1906 ते 1910 या चार वर्षात सावरकर लंडन येथे बॅरिस्टर होण्यासाठी गेले; या चार वर्षातील सवरकरांनी लिहिलेल्या कविता या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होत्या. मराठी साहित्यात अजरामर झालेले गीत " ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला" सवरकरांनी ब्रायटन च्या समुद्रकिनाऱ्यावर लिहिले. तसेच मुंबईहून लंडनला बोटीने प्रवास करताना सावरकरांनी "तारकास पाहून" ही नितांतसुंदर कविता लिहिली. मारसेलिस ची उडी विफल गेल्यास भारतात परतत असताना " अनादि मी अनंत मी अवध्य मी मला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला" ही कवचमंत्रासारखी कविता लिहिली. सावरकरांनी मराठी कवितेला "वैनायक" नावाचे एक नवे वृत्त दिले. सावरकरांनी इयत्ता सहावीत असताना Lady of Lake या प्रसिध्द इंग्रजी कवितेचे मराठीत काव्यमय भाषांतर केले. सावरकरांची उर्जस्वल मराठी कविता इंग्रजीत भाषांतरीत करून सांगितल्यामुळे लंडनमधील अमराठी श्रोत्यांना ही एक वेगळा आनंद झाला.
सावरकरांनी इंग्रजीत लिहिलेली The Revolutionist to Himself ही कविता कार्यक्रमात आवर्जून सादर केली गेली. सावरकरांवर असलेला इंग्रजी कवी जॉन मिल्टन व त्याच्या Blank Verse चा प्रभाव याचंही विश्लेषण डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी केलं .
लंडन मधील महाराष्ट्र मंडळात सावरकर जयंती निमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमाला सावरकर प्रेमींनी गर्दी केली
होती. या कार्यक्रमाच्या शेवटी सावरकरांनी लिहिलेल्या " संन्यस्त खड्ग" या नाटकातील एक प्रवेश दिव्येश बापट व युवराज ताम्हणकर यांनी सादर केला. कार्यक्रमातील गीते सुमेधा बेडेकर, अंजली डोंगरे यांनी सुरेल आवाजात सादर करत लँडनवासीयांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन, संहिता लेखन व सूत्रसंचालन डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी केले.
तत्पूर्वी महाविद्यालयाच्या 29 विद्यार्थ्यांच्या चमूने सावरकर 1906 ते 1910 दरम्यान ज्या इंडिया हाऊस मध्ये राहिले त्या वास्तुचेही दर्शन घेतले. याप्रसंगी डॉ विजय बेडेकर व डॉ सुधाकर आगरकर यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. हा लंडनच्या शैक्षणिक सहलीचा उपक्रम मागच्या सोळा वर्षांपासून प्रत्येक वर्षी साधारणतः मे महिन्यात आयोजित करण्यात येतो. यातून विद्यार्थ्यांना इंग्लडच्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज व लंडन मधील शैक्षणिक संस्था, ग्रंथालये व संग्रहालयाची ओळख व्हावी या उद्देशाने ही सहल आयोजित होते असे विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी सांगितले.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन
परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...
-
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी "लोकमान्य टिळक केसरीतील निवडक लेखसंग्रह" या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस...
-
भाषा ही जीवनमूल्यांचे संचित देते : पद्मश्री डॉ गणेश देवी ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातर्फे कै डॉ वा ना बेडेकर...
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें