मंगलवार, 4 दिसंबर 2018

ज्ञानेश्वर महाराज, आपण मराठी जनांच्या मुलुखात विवेकवेलीची लावणी केली. अमृताशी ही स्पर्धा करणारे शब्द मराठीतून मुखरीत केले. आपल्या ज्ञान संजीवणीने व शब्द सामर्थ्याने जन्मोजन्मीचे दुःख क्षणभरात विसरून जाणाऱ्या तमाम वारकऱ्यांच्या मुखी आपले नाव ऐकत अनेक पिढ्या लहानाच्या मोठया झाल्या. आपला अनुभव अमृतानुभव झाला व या अनुभवामृताचा काठोकाठ भरलेला कलश आपण आम्हास दिला. एखाद्या विरहातूर प्रेमीकेस हुरहूर लागावी आशा उत्तमोत्तम विराण्या आपण किती सहज लिहून गेलात. समाजानी दुर्लक्ष केलेल्या कावळ्याला देखील आपण "दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी" म्हणत पांडुरंग भेटीचे शकुन सांगायला लावलं. संसार टाकायचा नाही तर संसार करत परमार्थ कडेस न्यायचा ही शिकवण आपली. याच शरीराच्या योगाने पुन्हा शरीराला येणे टळेल व हे "पुनरपि जननं" च्या येरझाऱ्या मधून मुक्तता मिळेल असं आपण सांगता. मनशुद्धि च्या मार्गावर जर वेगाने विजयी असेल तर आपले कर्म सबळ हवे, इथे आळस करू नका असा सल्ला आपण दिला. तत्कालीन सामाजिक चौकटीत अध्यात्म क्षेत्रात लोकशाही आणून सर्व जातीजमातीत गीतारुपी देशिकार लेण्याची ज्ञानेश्वरी च्या रूपाने मुक्तपणे उधळण केली . किती लोभस शब्दकळा आपण मराठीला दिली. आपल्या अक्षर वाणीला परतत्वाचा स्पर्श झाल्या मुळे सातशे वर्ष झाले तरी आपल्या ओवीचं गारुड मराठी जनमानसावर अजून आहे. आपली समाधी म्हणजे आमच्या सारख्या अनंत मुमुक्षु साधकांसाठी तिर्थस्थळ आहे. आपण विश्वाची माऊली आहात. तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी।। मी कलाकुसरी काहीच नेणे। बोलतो वचने अतिभाविका।। संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शत शत नमन। प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...