मंगलवार, 28 अगस्त 2012

Delhi Visit on the Cards

This photo is with Prof.Dr. Satya Vrat Shastri, noted Sanskrit writer and Dnayanpeeth award winner poet. He lives in Delhi. I met him in my Delhi Visit. He has started writing Poems in Sanskrit  when he was just 13. A true genius. 

I am indeed pleased to announce  all my blog readers that I am going to Delhi by aeroplane.
This Visit is sponsored by Dept. of English, Yashwantrao Mohite College, Pune, especially Dr. Viviekanand Rankhambe is instrumental for the same.
JNU Central University Library Visit and the purchase of books of Rs. 30,000/- is expected.
I am going to live at Bharati Vidyapeeth's Delhi Campus "Paschim Vihar". I am very much excited for this visit. 

गुरुवार, 19 जुलाई 2012

My Two Gazals has been selected by Bhimrao Panchale for an Anthology of Gazls

सांगण्यास अत्यानंद होतो कि माझ्या दोन मराठी गजल भीमराव पांचाळे यांच्या '' सुरेश भटानंतर मराठी गजल " या संग्रहासाठी निवडल्या आहेत।

गुरुवार, 17 मई 2012

मातृदिनानिमीत्त वैभव जोशींची गझल.


आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई
तुझ्याविना पण जगावयाचा स्वभाव नाही आई/

दारावर पाटीच्या जागी “आई”लिहिले आहे
याहून कुठले साजेसे नावगाव नाही आई/

काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते
माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई/

तुला पाहूनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली
बाकी ह्या अंगणी फ़ुलांचा आभाव नाही आई/

छप्पर होते तुझे तोवरी वादळ तुडवीत होतो
आता साध्या फ़ुंकरीपुढे निभाव नाही आई/

एक तुझे ते असणे होते एक तुझे ते नसणे
या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई/

काफ़ीया किती सिध्दहस्तपणे वापरता येतो ते वैभव जोशी या गझलेत दाखवतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेत १३ तारखेच्या कवीसंमेलनात सादर झालेली ही गझल.

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली,सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली,या झोपडीत माझ्या //

महाली मऊ बिछाने,कंदील शामदाने,
आम्हा जमीन माने ,या झोपडीत माझ्या //

भूमीवरी पडावे ,ता-यांकडे पहावे,
प्रभूनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या //

स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे,
माझा हुकूम गाजे,या झोपडीत माझ्या //

महालापुढे शिपायी, शस्त्र सुसज्ज राही,
दरकार तीही नाही,या झोपडीत माझ्या //

जाता तया महाला,“मत जाव” शब्द आला,
भिती न यावयाला,या झोपडीत माझ्या//

महालात चोर गेले,चोरून द्रव्य नेले,
ऐसे कधी न झाले,या झोपडीत माझ्या //

पहारे आणि तिजो-या, त्यातून होती चो-या,
दारांस नाही दो-या,या झोपडीत माझ्या //

महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही,
झोपेत रात्र जाई,या झोपडीत माझ्या //

येता तरी सुखे या,जाता तरी सुखे जा,
कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या//

चित्त्तात अन्य रामा, ह्रदयी उदंड प्रेमा,
येती कधी न कामा,या झोपडीत माझ्या //

पाहून सौख्य माझे,देवेंद्र तो ही लाजे,
शांती सदा विराजे,या झोपडीत माझ्या //

वाडे महाल राने,केले अनंत ज्याने,
तो राहतो सुखाने,या झोपडीत माझ्या //

तुकड्या मती स्फ़ुरावी, पायी तुझ्या रमावी,
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या //


                                                   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


A renown social reformer and the author of famous ''Gram-Geeta" Tukdoji Maharaj has written this delicate peace of poetry. The beauty of poem lies in the choice of words and in the sustained comparison between the luxuries of sophisticated life and the rustic life of poor folks.My brother Vishnu used to hum this poem when i was just a child. 
भूमीवरी पडावे ,ता-यांकडे पहावे,
प्रभूनाम नित्य गावे, These colloquial phrases are so effective and reminiscent of my childhood when we used to sleep on terrace and see the galaxy of glimmering stars. The childhood memories run riot in my mind when i read this poem  in 'Lokrajya Magazine', which has been given by Shripad Joshi.

रविवार, 29 अप्रैल 2012

सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळ, नाशिक यांच्या वतीने “रूग्वेद-दर्शन” या त्रैमासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न




सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळ, नाशिक यांच्या वतीने “रूग्वेद-दर्शन” या त्रैमासिकाचा प्रकाशन सोहळा दि. २९/०४/२०१२ रोजी एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ वेदाभ्यासक  मा.श्रीकांत बहुलकर , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या माजी मानद सचिव मा. सरोजा भाटे अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. अवलोकनच्या संपादिका मा. वर्षा देवकर आणि अतिथी संपादक म्हणून पुणे विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक मा. रविंद्र मुळे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.नाना देशपांडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत धर्माधिकारी यांनी केले.
महंत चरणदासजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वेदांची अविरत साधना करणा-या वेदमूर्ति गणेश कृष्ण गुरूजी व वेदमूर्ति दंडगे गुरुजी या दोन घनपाठी वैदिकांचा सत्कार करण्यात झाला.
मा. श्रीकांत बहुलकर म्हणाले की, वेदांचे अध्ययन हे मौखिक परंपरेने (oral Tradition) झाले आहे. मॅक्स मुलर आदि जर्मन तत्ववेत्यांनी वेदांबद्द्ल केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेत पंडीत सातवळेकरांनी केलेल्या कामचाही विशेष गौरव त्यांनी केला.’विद’ या संस्कृत धातुपासून निर्माण झालेल्या Vidio व visual अशा ईंग्रजी शब्दांशी त्याचं नातं अधोरेखीत केले.
वेदांचा प्रचार व प्रसार हे काम करत असलेल्या संस्थांचा उल्लेख करंत पुढील काळात वेदांचे काम फ़ार आशादायी पध्द्तीने पुढे चालु ठेवण्याकडे बहुलकरांनी
 निर्देश केला.
सरोजा भाटे यांनी संस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या व संस्कृत व वैदिक ग्रंथांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेत ग्रंथनिर्मिती करावी असे निर्देश केले.
अध्यक्षीय भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी निवेदक म्हणून तोंडभरून कौतुक केलं. आद्य शंकराचार्यांच्या कालखंडातील मंडणमिश्राच्या दारातल्या पोपटाची त्यांनी मला उपमा दिली. अर्थात मी त्याचा आनंदाने स्विकार केला व माऊलींच्या शब्दात म्हणालो

का बालक बोबडा बोली/ का वाकुडा विचुका पाऊली//
ते चोज करूनी माऊली / रिझे जेवी//
तैसा मी तुम्हाप्रती/ चावटी करीतसे बाळमती/
परी तुम्ही संतोषा ऐसी जाती/ प्रेमाचिया //
मला अनपे्क्षित सत्कार मा. बहूलकरांच्या हस्ते झाला. भाटे मॅडमनी कौतुक केलं.
पूण्यात हा माझा पहीला कार्यक्रम व निवेदनाचा म्हणून देखील पहीलाच.
विद्वानांच्या मांदियाळीत फ़ार आनंद वाटला.
विद्यार्थि सहायक समीतीचे पर्यवेक्षक मा. श्रीनिवास देशमुख व Y.Mohite महाविद्यालयाचे ईंग्रजी विभागप्रमुख मा.राजाराम झिरंगे पालक म्हणून उपस्थित होते.
अर्थात रविंद्र मुळे सरांनी ही संधी दिली व ते त्यांच्याच कृपेने सिध्दिस गेले अशी भावना माझ्या अंतरंगात आहे.

रविवार, 22 अप्रैल 2012

'बाबू band बाजा'

असा कसा जीव बाई दो-याले विनावा/
सुखाची घागर त्याले मातीचा गिलावा//

तोलाचं बोलण बाई तोलाचं जगण/
सुखात राहुदे हेच थोडसं मागण //

पाठी पोटाले बांधून बाई दु:खाची वरात/ 
किती पदराले गाठी अन अंधार घरात //

कवी प्रकाश होळकर 

('बाबू band बाजा' )
 फिल्म  मधून साभार

चित्रपट आवर्जून पहाण्या सारखा आहे 
अवश्य पहा.
मस्त.

थेट केला न वार लोकांनी

थेट केला न वार लोकांनी
 लावले फक्त दार लोकांनी 

श्वास राहू दिला जगायाला
 स्वप्न नेले हुशार लोकांनी

शब्द साधेच वागले माझे
 फार केला विचार लोकांनी 
वैभव जोशी 
नेमक्या शब्दात कमाल अर्थवत्ता भारलेले शब्द . जगण किती बारकाव्याने अभ्यासालय या माणसाने.
वा वा वा !!!!!!!

M K Naik