आयुष्याला
घाबरण्याचा स्वभाव नाही आई
तुझ्याविना
पण जगावयाचा स्वभाव नाही आई/
दारावर पाटीच्या जागी “आई”लिहिले आहे
याहून
कुठले साजेसे नावगाव नाही आई/
काय
करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते
माझा
दगडी देवांशी बेबनाव नाही आई/
तुला
पाहूनी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली
बाकी
ह्या अंगणी फ़ुलांचा आभाव नाही आई/
छप्पर
होते तुझे तोवरी वादळ तुडवीत होतो
आता
साध्या फ़ुंकरीपुढे निभाव नाही आई/
एक
तुझे ते असणे होते एक तुझे ते नसणे
या
जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई/
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें