ज्येष्ठ संस्कृतज्ञ डॉ प्रमोद लाळे यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली व एक मोठा विद्वान काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव झाली. त्यांच्याकडे पुण्यात असताना बरेचदा जाण्याचा योग आला . त्यांचं आयुष्य अध्ययन अध्यापन व संशोधनात गेलं. ते उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे संस्कृत विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
डॉ लाळे यांनी उस्मानिया विश्वविद्यालय (हैद्राबाद) येथे 1979 साली 'मल्लिनाथाची साहित्यसंपदा' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यातील शोधनिबंधाचे ग्रंथ रूपात 'मष्टिनाथ-मनीषा' या शीर्षकार्थाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. २२ विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. हा शोध-निबंधांचा संग्रह डॉ. प्र. ग. लाळे यांनी ग्रंथ स्वरुपात ‘मल्लिनाथ-मनीषा’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यातील ९ निबंध संस्कृत भाषेत असून इतर तेलुगू आणि इंग्रजी भाषेत आहेत . मल्लिनाथ हा टीकाकार म्हणून इतका प्रसिद्ध होता की ‘मल्लिनाथी’ हा शब्द टीका याअर्थी मराठीत रूढ झाला आहे.
डॉ लाळे यांनी 'मल्लिनाथ' या प्रख्यात टीकाकारावर जो मोनोग्राफ साहित्य अकादमी साठी लिहिला त्याच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचं अजून एक गाजलेले पुस्तक म्हणजे Curses and boons in the Vālmīki Rāmāyaṇa. वाल्मिकी रामायणातील शाप व वरदानांवर हे पुस्तक प्रकाश टाकते.
त्यांच्या निधनाने त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या काही आठवणी जाग्या झाल्या. 2012 साली भारती विद्यापीठात मी तेव्हा रिसर्च फेलो म्हणून काम करत असे. डॉ विवेकानंद रणखांबे Vivekanand Rankhambe व डॉ राजाराम झिरंगे Rajaram Zirange यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्प सुरू होता. अनेक नव्या गोष्टी शिकत होतो. यावेळी रामायण महाभारताचा भारतीय इंग्रजी साहित्यावरील प्रभाव या विषयावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ लाळे यांना व्याख्यानासाठी बोलावले होते. डॉ शिरीष चिंधडे देखील व्यासपीठावर खालील फोटोत त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. माझ्या फेसबुक प्रोफाईलवर 2012 सालचे काही फोटों परत एकदा पोस्ट करत आहे. पंडित वसंतराव गाडगीळ देखील उपस्थित होते.
त्यांच्या कर्तृत्वाला कोटी कोटी वंदन.