शनिवार, 18 सितंबर 2010

माझी नवी गझल....

गोडगुलाबी थंडीमधली आठवण झाली/

स्पर्शुन गेल्या मंद हवेची आठवण झाली/

केस मोकळे ओले सोडून बसली होतीस /
थंडथंड त्या जलस्पर्शची आठवण झाली/

आज न्हाऊनी आली आसावी सकाळ सखये/
भुरभुरणा-या तव केसांची आठवण झाली/

माळून आली होतीस गजरा बकुळीचा तू/
मंतरलेल्या त्या श्वासांची आठवण झाली/

झाले भांडण बहुधा तेंव्हा पणतीचे तुळशीशी /
तुझ्या मखमली मंजुळ ध्वनीची आठवण झाली/

समोर तू येताना मी गलबलूनी गेलो /
विसरून गेल्या त्या पत्राची आठवण झाली/

तू काही अन मी काहीतरी बॊलत होतो/
नेमकेच राहून गेल्याची आठवण झाली/

All those striking mamories of a imaginary lover has been brought up for u....
enjoy  it...As i am the student of Kholeshwar College,Ambajogai,which was the starting point of my literary pilgrimage and where i got the sumptous stimulus of my Gazal.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...