शुक्रवार, 23 सितंबर 2011

अमोल आगासे कडून साभार…


अशा कार्तिकी गा-यात तुझ्या आठवांची ऊब.
डोळ्यापुढचं हटंना तुझं कोजागिरी रूप.

वारा करीतो लगट तुझ्या रेशमी केसांशी.
माझा अवखळ श्वास खेळे तुझ्याच श्वासांशी.

भाव मखमली सारे दोन्ही डोळ्यात साचले.
आले समजून सारे डोळे डोळ्यांनी वाचले.

चंद्र सांडला पडला गो-यागो-या गालावर.
माझ्या ओठांची नजर तुझ्या काळ्या तिळावर.      

तुझ्या ओठात अमृत सांग कसे ग सांडले.
ओढ खट्याळ ही अशी ओठ ओठांस भांडले.

माझ्या श्वासात गुंतले घट्ट मिठीतले क्षण..
होते बेभान अवेळी माझे मोरपंखी मन.

भेटीसाठी आसुसले माझे बळकट बाहू
सखे तुझ्या विरहात कसा एकटाच राहू ..


माझा ख-या अर्थानं कवीमित्र असलेला अमोल आगासेनी लिहिलेली ही अप्रतिम कविता. मला प्रथम दर्शनीच ही कविता इतकी आवडली कि मला त्याचा हेवा वाटला. विरहाचे क्षण इतके हळवे ,कातर व जीवाची घालमेल करणारे असतात हे ही कविता वाचून समजते..
कालपरवा तो ज्या शेवगावच्य़ा (नगरजवळील)महाविद्यालयात इंग्रजी साहित्य शिकवतो तिथे विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्य़ाचा योग आला होता. तेव्हा समजलं की आपल्याकडे धडपडनारी तरूणाई आहे व कवितेच.व्रत घेवून जगणारे अमोलसारखे मित्रही आहेत.
कदाचित Pre-Rhaphallite गटात मोडनारी ही कविता कालिदसाच्या चिरंतन अशा मेघदूताची आठवण नक्कीच करून देईल अशी अपेक्षा आहे..
Enhanced by Zemanta

शुक्रवार, 16 सितंबर 2011

नकोच आता.........

नकोच आता.........
परतून येणे तुझ्याच गावा नकोच आता
वाजवने दु:खाचा पावा नकोच आता//

कळवळलेला प्राण जाहला व्याकुळ राणी
झालर त्याला तव स्नेहाची नकोच आता//

बोलून घेवू स्पष्ट मोकळे मनातलेही
खोटे खोटे हसने अवचित नकोच आता//

वाट पाहिली तुझ्या विखारी संदेशांची
जीव लावने पुन्हा एकदा नकोच आता.//

तुझ्यानि माझ्या वाटेवरती चंद्र पहुडला
तुला तयाची द्रुष्ट लागने नकोच आता.//

तुझ्या मनाच्य़ा कड्याकपारी कोण राहते
छ्डा लावने त्वरीत तयाचा नकोच आता/./

संचित ठेवू जपून आपले प्रेमभराने
पुनरुक्तिचा दोष लागने नकोच आता..


जीवाची घालमेल होत असतानाचा काळ खराच जीवाला हुरहुर लावनारा आहे.
यशप्राप्तिपूर्वीची हि अगतिकता कधीही नष्ट होवू नये असेच वाटते.


शुक्रवार, 20 मई 2011

Shrikant Susar Passed the Set exam

It is indeed a good news that Shrikant Passed the Set exam.  He is the only student who could pass from all over Maharashtra. Very best wishes for him, I have observed in him two very precious things, which led him to success.The first is Patience and next is the strong determination.He was ready to fight for the next attempt as well. Interestingly before one day of Result we discussed about the strategies for the upcoming Net exam 11.

Now it is added responsibility  and a Ray of Hope  for rest of us.



 Very best of Luck Shrikant.....May God Bless u.

शुक्रवार, 22 अप्रैल 2011

कठिणच दिसते/

इथून पुढचे सगळे आता कठिणच दिसते/
भिरभिरणारे मन आवरणे कठिणच दिसते //


जगण्याच्या या वाटेवरती थकलो चालून /
उनाड रस्ते संपवनेही कठिणच दिसते //


स्वर आळवले,रुतु मावळले आणि उसासे.
श्वासांना त्या मंतरणेही कठिणच दिसते..


कलू लागला चंद्र जरासा तुझ्या दिशेने /
तुझ्या मिठीची कूस बदलने कठिणच दिसते//


आम्रमंजीरी डवरून गेल्या चैत्रपहाटी
मिलनोत्सुक अधरांना छळणे कठिणच दिसते.


सगळे भेटून गेले पण तू आलीच नाहीस
तुझ्या मनाची दिशा बदलणॆ कठिणच दिसते.


भुरभुरणा-या तव केसांचे विश्लेषण करता.
गज-याचे त्या अवचित फ़ुलने कठिणच दिसते /


फार पाहिली तडजोडीची भाषा बोलून .
आपले राणी आता जमने कठिणच दिसते.

This Gazal has been written under the pathetic circumstances when i left Vidyarthi Sahayk Samiti.
As Mathew Arnold , in his masterpiece ''DoverBeach.argued that the world had lost its certitude,loyalties,and honesty. HE is asking his beloved to be true with him. Arnold Says;

'' Ah, love, let us be true
To one another! for the world, which seems
To lie before us like a land of dreams,
So various, so beautiful, so new,
Hath really neither joy, nor love, nor light,
Nor certitude, nor peace, nor help for pain;
And we are here as on a darkling plain
Swept with confused alarms of struggle and flight,
Where ignorant armies clash by night. 


We can perceive the echos of this poem in my Gazal.

शनिवार, 26 मार्च 2011

The rain of immortality

i am in the class waiting for prof.Abhynkar sir,who teaches us French.In first photo u can see my French friends :Avinash Bhatt and Gajendra Pardhe. and its Class room complex of Commerce Dept. of  Pune University.
i suddenly recalled by Suresh Bhat's Gazal and wrote it immidiately on the board.
actually we were ruminating on the examinations and the preperations of the same.Probably i am planning to write my blog in french.Let us See...
We are quite enjoying the venture.
Au revoir.........

सोमवार, 28 फ़रवरी 2011

French recitation Competetion in Ranade Institute.

I have just participated in the annual function of French Recitation Competetion organised by Ranade Institute,which is the dept of PuneUniversity for Foreign Languages.
"Au Claire de la lune
Mon ami Pierrot
prete moi ta porte
pour ecrir mot.":
It was an annonymous poem,perhaps a folksong.
There was a performance of French Drama in which i have played a role of colligiate boy namely Rene.our group done well.Now we are having Prof .Ravindra Abhyankar as French Teacher.he is a scholar of Language and more importantly knows the student psychology.
Let us seee..
काल समितीमध्ये माजी विद्यार्थी मेळावा झाला.
अंकुर मध्ये माझी गजल प्रकाशित झाली..
सध्यातरी बरा आहे.

बुधवार, 16 फ़रवरी 2011

व्हॅलेंटाईन डे विशेष ,

धुंद त्या प्रत्येक क्षणीचा भाव शोधत राहीलो /
मी तिची कातर स्वरांनी साद मागत राहीलो //

मज कळेना ही अशी चैतन्यवेली लुप्त का ?
पण नव्याने उमलना-या पालवीवर भाळलो //

पालवी नवी फ़ुटत असताना मला ती बोलली /
बोलली नाही मला ती बोलताना भासली //

ती नजाकत ती सुरावट का मला भावून गेली /
मी तिला कोमल फ़ुलांनी गंधाळताना भासलो /

स्पष्ट सांगून टाकल्या मी कहाण्या माझ्या व्यथांच्या /
अन तिच्या कोमल अशा त्या लोचनांतून तरळलो/

मेघदूताला तरीही ठेवलेले सोबतीला /
त्या खुळ्या यक्षासवे आयुष्य मोजत राहीलो //

i am very much happy to tell my all blogreaders that Daily Sakal has recently published my Gazal on the special occasion of Valentine Day 14 Feb 2011 in uth tube suppliment..The gazal was already published by me on this blog entitled Sanj Diwani.
the obove gazal is my tribute to this auspicious day.
Happy Valentines Day

M K Naik