शुक्रवार, 23 सितंबर 2011

अमोल आगासे कडून साभार…


अशा कार्तिकी गा-यात तुझ्या आठवांची ऊब.
डोळ्यापुढचं हटंना तुझं कोजागिरी रूप.

वारा करीतो लगट तुझ्या रेशमी केसांशी.
माझा अवखळ श्वास खेळे तुझ्याच श्वासांशी.

भाव मखमली सारे दोन्ही डोळ्यात साचले.
आले समजून सारे डोळे डोळ्यांनी वाचले.

चंद्र सांडला पडला गो-यागो-या गालावर.
माझ्या ओठांची नजर तुझ्या काळ्या तिळावर.      

तुझ्या ओठात अमृत सांग कसे ग सांडले.
ओढ खट्याळ ही अशी ओठ ओठांस भांडले.

माझ्या श्वासात गुंतले घट्ट मिठीतले क्षण..
होते बेभान अवेळी माझे मोरपंखी मन.

भेटीसाठी आसुसले माझे बळकट बाहू
सखे तुझ्या विरहात कसा एकटाच राहू ..


माझा ख-या अर्थानं कवीमित्र असलेला अमोल आगासेनी लिहिलेली ही अप्रतिम कविता. मला प्रथम दर्शनीच ही कविता इतकी आवडली कि मला त्याचा हेवा वाटला. विरहाचे क्षण इतके हळवे ,कातर व जीवाची घालमेल करणारे असतात हे ही कविता वाचून समजते..
कालपरवा तो ज्या शेवगावच्य़ा (नगरजवळील)महाविद्यालयात इंग्रजी साहित्य शिकवतो तिथे विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्य़ाचा योग आला होता. तेव्हा समजलं की आपल्याकडे धडपडनारी तरूणाई आहे व कवितेच.व्रत घेवून जगणारे अमोलसारखे मित्रही आहेत.
कदाचित Pre-Rhaphallite गटात मोडनारी ही कविता कालिदसाच्या चिरंतन अशा मेघदूताची आठवण नक्कीच करून देईल अशी अपेक्षा आहे..
Enhanced by Zemanta

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...