सुंदर संस्कार व स्वाध्याय मंडळ, नाशिक यांच्या वतीने “रूग्वेद-दर्शन” या त्रैमासिकाचा प्रकाशन सोहळा दि. २९/०४/२०१२ रोजी एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ वेदाभ्यासक मा.श्रीकांत बहुलकर , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या माजी मानद सचिव मा. सरोजा भाटे अध्यक्ष म्हणून लाभल्या होत्या. अवलोकनच्या संपादिका मा. वर्षा देवकर आणि अतिथी संपादक म्हणून पुणे विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक मा. रविंद्र मुळे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.नाना देशपांडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत धर्माधिकारी यांनी केले.
महंत चरणदासजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वेदांची अविरत साधना करणा-या वेदमूर्ति गणेश कृष्ण गुरूजी व वेदमूर्ति दंडगे गुरुजी या दोन घनपाठी वैदिकांचा सत्कार करण्यात झाला.
मा. श्रीकांत बहुलकर म्हणाले की, वेदांचे अध्ययन हे मौखिक परंपरेने (oral Tradition) झाले आहे. मॅक्स मुलर आदि जर्मन तत्ववेत्यांनी वेदांबद्द्ल केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेत पंडीत सातवळेकरांनी केलेल्या कामचाही विशेष गौरव त्यांनी केला.’विद’ या संस्कृत धातुपासून निर्माण झालेल्या Vidio व visual अशा ईंग्रजी शब्दांशी त्याचं नातं अधोरेखीत केले.
वेदांचा प्रचार व प्रसार हे काम करत असलेल्या संस्थांचा उल्लेख करंत पुढील काळात वेदांचे काम फ़ार आशादायी पध्द्तीने पुढे चालु ठेवण्याकडे बहुलकरांनी
निर्देश केला.
सरोजा भाटे यांनी संस्थेच्या कामाला शुभेच्छा दिल्या व संस्कृत व वैदिक ग्रंथांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेत ग्रंथनिर्मिती करावी असे निर्देश केले.
अध्यक्षीय भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी निवेदक म्हणून तोंडभरून कौतुक केलं. आद्य शंकराचार्यांच्या कालखंडातील मंडणमिश्राच्या दारातल्या पोपटाची त्यांनी मला उपमा दिली. अर्थात मी त्याचा आनंदाने स्विकार केला व माऊलींच्या शब्दात म्हणालो
का बालक बोबडा बोली/ का वाकुडा विचुका पाऊली//
ते चोज करूनी माऊली / रिझे जेवी//
तैसा मी तुम्हाप्रती/ चावटी करीतसे बाळमती/
परी तुम्ही संतोषा ऐसी जाती/ प्रेमाचिया //
मला अनपे्क्षित सत्कार मा. बहूलकरांच्या हस्ते झाला. भाटे मॅडमनी कौतुक केलं.
पूण्यात हा माझा पहीला कार्यक्रम व निवेदनाचा म्हणून देखील पहीलाच.
विद्वानांच्या मांदियाळीत फ़ार आनंद वाटला.
अर्थात रविंद्र मुळे सरांनी ही संधी दिली व ते त्यांच्याच कृपेने सिध्दिस गेले अशी भावना माझ्या अंतरंगात आहे.