सोमवार, 24 अक्टूबर 2011

दीपावलीच्या सर्वांना अंत:करणपूर्वक शुभकामना.


.
महाराष्ट्राचे महान संत व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असनारे आळंदीनिवासी माउली
आपल्या भावार्थदीपिकेत म्हणतात…

अहो दीपकळिक धाकुटी /बहु तेजाते प्रकटी/
सद्बुध्दी हे थेकुटी/ म्हणो नये.//

सद्विवेकाचा दीप व त्याची दीपकळीका जरी धाकुटी म्हणजे लहान असेल तरीही बहुतेजाचं प्रकटीकरण करणारी असते.
त्याप्रमाणे सद्बुध्दी मानसाचं जीवन प्रकाशीत करते.  माऊलींना दिवाळी या सणाचा असा गर्भितार्थ तर सांगायचा नाही ना?
 माउली पुढे म्हणतात. 

मी अविवेकाची काजळी/फेडोनी विवेकदीप ऊजळी/
ते योगीया पाहे दिवाळी /निरंतर//

विवेकाची काजळी काढून विवेकदीप उजळला कि मग निरंतर दिवाळी साजरी करता येते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...