शुक्रवार, 22 अप्रैल 2011

कठिणच दिसते/

इथून पुढचे सगळे आता कठिणच दिसते/
भिरभिरणारे मन आवरणे कठिणच दिसते //


जगण्याच्या या वाटेवरती थकलो चालून /
उनाड रस्ते संपवनेही कठिणच दिसते //


स्वर आळवले,रुतु मावळले आणि उसासे.
श्वासांना त्या मंतरणेही कठिणच दिसते..


कलू लागला चंद्र जरासा तुझ्या दिशेने /
तुझ्या मिठीची कूस बदलने कठिणच दिसते//


आम्रमंजीरी डवरून गेल्या चैत्रपहाटी
मिलनोत्सुक अधरांना छळणे कठिणच दिसते.


सगळे भेटून गेले पण तू आलीच नाहीस
तुझ्या मनाची दिशा बदलणॆ कठिणच दिसते.


भुरभुरणा-या तव केसांचे विश्लेषण करता.
गज-याचे त्या अवचित फ़ुलने कठिणच दिसते /


फार पाहिली तडजोडीची भाषा बोलून .
आपले राणी आता जमने कठिणच दिसते.

This Gazal has been written under the pathetic circumstances when i left Vidyarthi Sahayk Samiti.
As Mathew Arnold , in his masterpiece ''DoverBeach.argued that the world had lost its certitude,loyalties,and honesty. HE is asking his beloved to be true with him. Arnold Says;

'' Ah, love, let us be true
To one another! for the world, which seems
To lie before us like a land of dreams,
So various, so beautiful, so new,
Hath really neither joy, nor love, nor light,
Nor certitude, nor peace, nor help for pain;
And we are here as on a darkling plain
Swept with confused alarms of struggle and flight,
Where ignorant armies clash by night. 


We can perceive the echos of this poem in my Gazal.

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...