शुक्रवार, 28 जनवरी 2011

माझी पहिली उर्दु गझल.

मयकशी आंखोंसे छलकता रहा रातभर प्यार यूं ही.
 अधुरा बेकरारसा तडपता रहा रातभर यूं ही.

वो आखोमे निंदको समाए हुए ,मै उनको आखोंमे,
इक झिलमिलाती हुई नजरको तरसता रहा रातभर यूं ही.

लफ़्ज खामोश थे बोलती रही वो कमसीम नजर,
उनकी करवटोंको बदलनेकी राह तकता रहा रातभर यूं ही.

डोळे दीपवून टाकणा-या यावनी सौंदर्याच्या मस्तानी अदांमधून अंत:प्रेरणेने आलेल्या काही ओळी.
अगदी हाताशी आलेल्या चंद्र्कोरीला जवळ घेवू न शकलेल्या व हवाहवा वाटणा-या त्या धुंद रात्रीच्या प्रवासाला विसरणे कसे शक्य होईल.

मंगलवार, 18 जनवरी 2011

चुकलेले कोकरू.

दोष कुणाचा ,तूच पहा, नकळत झाल्या चुका :
वाट शोध शोधली :शेवटी थकून बसलो मुका .ऐल कळेना ,पैल दिसेना :बघ ,सापडलो इथे
गहन घोर तिमिरात एकला बन –ओसाडीमधे .

कुणीच नाही काय नेणत्या पतिताला आसरा ?
कुठेच नाही दिसत ,अरेरे बुड्त्याला कासरा
घरट्याखाली पडले इवले बीनपंखी पाखरू/
हुरहुर बघते कळपामधले चुकलेले कोकरू /


तळमळलो ,व्याकुळलो ,आणिक सभोवार देखिले;
हाक घातली पुन्हा पुन्हा पण पडसादच ऐकले .
जिवास होता तुझा भरवसा :फ़ोल ठरविलास ना
उमेद खचली आणि तनूची निमालीच चेतना.


मायमाउली, नकोस हयगय गरिबाविषयी करूं
चुकलो असलो तरी शेवटी तुझेच मी लेकरू.
                                                   ना घ. देशपांडे.


Yesterday i have purchased a book of poetry in marathi namely ’शीळ’ by noted marathi poet N.G.Deshpande.The lighter vein of the book deals manely with love.
The above poem deals with persuading vein to ask for excuse..
The very touchy atmaosphere shocks the readers.
i hope all the blog readers will enjoy it

रविवार, 2 जनवरी 2011

मानस माझे

मानस माझे दाटून तेंव्हा आले होते /

अंत:करणी ओथंबून दव आले होते//

जिला ठेविले जपून सुगंधी अत्तरदाणीत/
कसे हे तीक्ष्ण फ़ुलांनी केले होते//

 चुका नेहमी होती, जाती ठेवून जखमा /
जखमांनाही आता कसे कळवळले होते//


मी केलेला गुन्हाच नव्हता रडण्यापडण्याजोगा/
गोंधळ करूनी तूच तयाला मोठे केले होते//

फ़ार वाटले होते तिजला फ़ुटेल पाझर आता/
उत्तर नकी होता माझे गणितंच चुकले होते//

समोरच्याने जरीही आता समज दाविली थोडी/
हातामधूनी निसटंत जगणे कधीच गेले होते//

सगळे साले स्वार्थासाठी लचके तोडून गेले /
स्वच्छ भावनांशी जणु त्यांनी सुतक पाळले होते//

हा एकाकी होऊन गेला प्रशांतेने सागर ./
तरंग उठला एक तरीही गलबलल्यागत होते//

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...