गुरुवार, 13 जून 2024

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन



परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 


संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे


कां झांकलिया घटींचा दिवा । 

नेणिजे काय जाहला केव्हां ।

या रीतीं जो पांडवा । 

देह ठेवी 


घटाखाली झाकलेला दिवा केव्हा काय झाला (विझला) हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना जो देह ठेवतो ॥८-९८॥


असं  कर्मयोगी जीवन श्री माधव जोशी जगले. अगदी शेवटपर्यंत कार्यमग्न राहिले. 


मराठी प्रकाशन विश्वात त्यांनी भरीव योगदान दिलं. 12 मे रोजी डॉ अशोकराव मोडक यांच्या 'अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या निमित्ताने मागील एक दोन महिन्यात त्यांच्याशी संपर्क, विभिन्न विषय व प्रकाशनाची कार्ययोजना इत्यादी विषयांवर चर्चा झाली. अत्यंत साधेपणा , विषयाची समज आणि वाचकांना नेमकं काय हवं याची उत्तम जाण ठेवून त्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करणारा प्रकाशक असं त्यांचं व्यक्तिमत्व. मागच्या महिन्यात दिनांक 12 मे रोजी झालेला पुस्तक प्रकाशनाचा फोटो हीच एक आठवण आयुष्यभर स्मरणात राहणारी आहे. 


भावपूर्ण श्रद्धांजली.


#माधवजोशी

#परममित्र 

#परममित्रप्रकाशन

#parammitra 

Param Mitra



परम मित्र पब्लिकेशन के संस्थापक तथा अभाविप के पूर्व पूर्ण कालिक  कार्यकर्ता श्री. माधव जोशी, ठाणे नहीं रहे।

आज, 13 जून 2024 को  सुबह 00.06 बजे उन्होंने अपनी अंतिम सांस ली।

आपने अभाविप के पूर्णकालिक कार्यकर्ता के नाते 1982 से 1987 तक मुंबई तथा राजकोट गुजरात में कार्य किया।

 तत्पश्चात सामाजिक तथा राष्ट्रीय विचार को प्रसृत करने हेतु स्वयं का पब्लिकेशन होना चाहिए इस भाव से परम मित्र पब्लिकेशन की स्थापना की।  राष्ट्रीय विचार विमर्श के अनेकानेक पहलुओं को पुस्तक के माध्यम से समाज के सम्मुख रखने का आपने सघन प्रयास किया।


 छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर अंग्रेजी में एक विस्तृत ग्रंथ की निर्मिती होनी चाहिए यह उन्होंने ठाना और देश के विख्यात इतिहासकार निनाद बेडेकर द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के संदर्भ ग्रंथ का निर्माण किया। 


अहिल्याबाई होलकर, संत तुकाराम, अयोध्या आंदोलन का लेखा-जोखा,  रामायण तथा महाभारत के काल पर शास्त्रीय तथ्यों के आधार पर लिखी निलेश ओक जी की अंग्रेजी पुस्तकों का मराठी अनुवाद ऐसी कई पुस्तक आपने प्रकाशित की।


अत्यंत सरल तथा सादगी पूर्ण,स्वभाव के धनी,  पापभीरू, अत्यंत प्रमाणिक,  मन में भी किसी के बारे में गलत ना सोचने वाले ऐसे थे माधव जोशी।

मात्र 66 वर्ष की आयु में आपने स्वर्गलोक का गमन किया।

भावपूर्ण श्रद्धांजलि। 

🙏🏼🌱

बुधवार, 12 जून 2024

जगती हाच खरा पुरुषार्थ

 जगती हाच खरा पुरुषार्थ॥ध्रु॥

या शरिराच्या कणाकणातुन

वसे त्यागमय जिवंत जीवन

व्यवहारी ते दावी उजळुन

जगतो सेवेच्या श्वासावर होत असे पुरुषार्थ॥१॥


जगेल अवयव का शरिराविण

घटक जगे का समाज सोडुन

या तत्त्वाने जगतो जीवन

समाज सारा कुटुंब गणिले सोडुनिया निज स्वार्थ॥२॥


परिस्थितीच्या चक्रव्युहातुन

झुंजत असता भ्रमते जीवन

परि ध्रुवावर दृष्टी खिळवुन

अंकित करता स्थान यशाचे होते जीवन सार्थ॥३॥


संसाराचे पाश तोडले

सौख्याशेचे नाव सोडले

जीवनकार्यी विलीन केले

व्यक्तित्वाला पार विसरलो केवळ राष्ट्रहितार्थ॥४॥


परि सत्त्वाचे तेज न साहुन

उफाळले खळ हे अपवाद न

रामहि गेले वनवासातुन

ग्रहण लागले सूर्यासम तरि साधियला परमार्थ॥५॥


एक वेळ रवि होइल शीतल

होइल अणुसम भव्य हिमाचल

राहणार परि आम्ही निश्चल सत्य असे साह्यार्थ॥६॥

M K Naik