बुधवार, 20 अक्टूबर 2010

दसरा व चतुश्रृंगी देवीसमोरची रांग ...............

 दाटून आली कातरवेळी सांज दिवाणी/
तव अधरांना चुंबून गेली सांज दिवाणी/

नवरात्रीही झाल्या आता असह्य मजला/
दर्शनरांगां खट्याळ हसते सांज दिवाणी/

संध्यावंदन करण्या नदीतटी संन्यासीगण /
भूलवून जाते त्यांना सुध्दा सांज दिवाणी/

संध्याकाळी सजणा-या त्या रातराणीला/
हिंदोळ्यावर खेळवते ना सांज दिवाणी/

मग एकाकी होतो आपण म्लाण मुखाने/
आठवत जाते तिच्या मिठीतील सांज दिवाणी/

नटून थटून मग कुणी एकटे निघते तिकडे/
वाट पाहते त्याच्याही आधी सांज दिवाणी/

छान , मोकळ्या अवखळणा-या केसांमधल्या/
गज-याशी त्या झोंबत असते सांज दिवाणी/

चुडीदार मग बहरून येतो तिने घातला/
तिच्यासवे मग बहरत जाते सांज दिवाणी/

दूरूनच दिसते येताना ती मंदगतीने/
त्यालाही मग अवचित डचते सांज दिवाणी//

प्रथम दिलेल्या पत्राचा मग दरवळ येतो/
तिच्या तोंडूनी अवखळ हसते सांज दिवाणी //

थरथरनारा हात पुन्हा मग ऊरी विसावे/
मंतरते त्या स्पंदानांही सांज दिवाणी/

सात्विक स्नेहा दिली कितीही दूषणे त्यांनी/
त्यांना सुध्दा पूरून उरते सांज दिवाणी/
This idea of writing Gazal came to me when i was struggling to get in to the long line of Chatushringi devotees. i immidiately came out of that fuss and reached my hostel.i suddenly went to the memory line of Ambajogai where i was habituated to the Yogeshwaari Devi,which is the abode of Bhagvatee.
this simple plot striked me to write gazal which is being a lietmotief .
How a wonderful evening (Saanj) make everyone restless and how we feel the sense of incompleteness ,when we do not find companion to share the musty thrill of evening. it is not only the celebration of fullness of companionship but the inherent instinct of man to share the agony and ecstasy of mind.
The marathi song "सांज ये गोकुळी "sung by Lata Mangeshkar is the stimulus to write this gazal. hope it will be the gift for Diwali and Daaara for all my blog readers.

सोमवार, 4 अक्टूबर 2010

मी गजला का लिहितो----.माझी नवी गजल..

असह्य जगणे सुसह्य करण्या लिहितो गझला /
मीठीत तुझिया विरघळण्याला लिहितो गझला /


छक्के पंजे बावरलेले ,गोंधळ्लेही/
जिंकून घेण्या डाव रडीचा लिहितो गझला /


स्नेहसरोवर दाटून आला नयनी तुझिया /
बिंदू होऊन त्यात मिसळण्या लिहितो गझला /


फार पाहिली वाट तुझी मी त्या दिवशीला/
त्या घाटाची वाट शोधण्या लिहितो गझला /


पाठमोरी तू किती देखणी वळली होतीस/
गज-याचा त्या गंध ऊजळण्या लिहितो गझला /


वीणा घेऊन रियाझ करण्या बसलेले ते/
मोहक रुपडे आळवण्याला लिहितो गझला /


कृतार्थ होईल असे वाटले जगणे माझे/
तुझाच राणी ठाव शोधण्या लिहितो गझला /


One of my friends, Shrikant Susar, keeps on asking me the same question of my motive of writing Gazaals.
This gazal is the poetic rejoinder to this question....which i have written in late night i.e.2.30 am.
The last couplet i.e.Makhta.is the concluding remark of my intention of my journey to Gazal.

परममित्र प्रकाशनाच्या श्री माधव जोशी यांचं दु:खद निधन

परममित्र प्रकाशनाचे PARAM MITRA Publications  श्री माधव जोशी यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ...